शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा खेळला गरबा, गुजरातमध्ये त्याला पाहण्यासाठी गर्दी, Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 16:32 IST

ऑलिम्पिक आणि डायमंड लीग विजेता गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने गुजरातच्या वडोदरा येथे नवरात्रोत्सवात सहभाग घेतला.

ऑलिम्पिक आणि डायमंड लीग विजेता गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने गुजरातच्या वडोदरा येथे नवरात्रोत्सवात सहभाग घेतला. यावेळी नीरजने गरबाही खेळला. ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नीरज गुजरातला गेला आहे आणि नवरात्रीच्या सणाचा आनंद साजरा करण्याचा मोह त्यालाही आवरता आला नाही. त्याला पाहण्यासाठी तरुण-तरुणींची गर्दी उसळली होती. नीरज येथील गरबा महोत्सवात पारंपरिक कपडे परिधान करून पोहोचला. त्याची एन्ट्री होताच उपस्थितांनी त्याच्या नावाचा गजर केला. काही लोकांनी खास गुजराती भाषेत ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો असे म्हटले. ( गरम गरम सीरो ( हलवा), नीरज भाई हीरो).   मागील महिन्यात नीरजने लॉसने डायमंड लीग (Lausanne Diamond League) स्पर्धेत विजेतेपद जिंकले होते आणि ही स्पर्धा जिंकणारा तो  पहिला भारतीय ठरला. त्याआधी त्याने वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Atheletics Championships) रौप्य पदक मिळवून या स्पर्धेतील भारताचा १९ वर्षांचा दुष्काळ संपवला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला तब्बल १९ वर्षांपूर्वी २००३ मध्ये पहिले पदक मिळाले होते. २००३ मध्ये भारताची स्टार अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जने पहिले पदक जिंकले होते, तिने महिलांच्या लांब उडीत कास्यंपदक पटकावले होते. 

नीरजची 'सुवर्ण' कामगिरी 

  • जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा - सुवर्णपदक
  • आशियाई स्पर्धा २०१८ - सुवर्णपदक 
  • राष्ट्रकुल स्पर्धा - सुवर्णपदक
  • टोकियो ऑलिम्पिक २०२० - सुवर्णपदक
  • जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा २०२२ - रौप्यपदक 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राNavratriनवरात्रीGujaratगुजरात