फिरकी गोलंदाजांवर भारताची मदार
By Admin | Updated: July 30, 2015 00:42 IST2015-07-30T00:42:05+5:302015-07-30T00:42:05+5:30
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. संघात अनुभवी फिरकी गोलंदाज असल्याचा फायदा भारतीय संघाला होण्याची शक्यता आहे.
फिरकी गोलंदाजांवर भारताची मदार
चेन्नई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. संघात अनुभवी फिरकी गोलंदाज असल्याचा फायदा भारतीय संघाला होण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वालील संघ या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळणार आहे. चार वर्षांनंतर संघात परतलेला अमित मिश्रा व हरभजन सिंग यांच्यासह रविचंद्रन आश्विन फिरकीचा भार सांभाळणार आहेत. मिश्रासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारत ‘अ’ संघातून खेळताना त्याची कामगिरी समाधानकारक झाली आहे; मात्र ३२ वर्षांच्या मिश्राला तरुण खेळाडूंचा भरणा असलेल्या संघात आपली छाप पाडावी लागणार आहे. माजी कसोटीपटू दिलीप जोशी यांनी ३२ व्या वर्षी संघात पदार्पण केले होते; मात्र त्यांनी १०० बळी घेण्याचा पराक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहली जर दोन फिरकी गोलंदाज खेळविणार असेल तर मिश्रा-हरभजन यांची भूमिका महत्त्वाची असेल. (वृत्तसंस्था)