आॅलिम्पिकमध्ये भारताचे स्पेशल ‘यश’

By Admin | Updated: July 28, 2015 01:49 IST2015-07-28T01:49:34+5:302015-07-28T01:49:34+5:30

अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या स्पेशल आॅलिम्पिक स्पर्धेत दिल्लीच्या यश सिंगने भारताच्या पदकांचे खाते उघडले. यशने जलतरणामध्ये चमकदार कामगिरी

India's special "success" in Olympics | आॅलिम्पिकमध्ये भारताचे स्पेशल ‘यश’

आॅलिम्पिकमध्ये भारताचे स्पेशल ‘यश’

लॉस एंजेलिस : अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या स्पेशल आॅलिम्पिक स्पर्धेत दिल्लीच्या यश सिंगने भारताच्या पदकांचे खाते उघडले. यशने जलतरणामध्ये चमकदार कामगिरी करताना कांस्यपदकाची कमाई केली.
विशेष म्हणजे, १३ वर्षीय यशने या पदकासह आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील देखील पहिलेच पदक मिळवले. यशने २५ मीटर बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये शानदार कामगिरी करताना १९.२३ सेकंदांची वेळ देत कांस्यपदकाला गवसणी घातली. दरम्यान, चांगल्या सुरुवातीनंतरही वेग वाढवण्यात अपयशी ठरल्याने यशला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक मिळवण्याचा मान मिळवल्याचा आनंददेखील यशने मिळवला. पहिल्या स्थानावरील जलतरणपटूने १६.८५ सेकंदांची वेळ देताना सुवर्ण, तर रौप्यपदक पटकावणाऱ्या जलतरणपटूने १९.१३ सेकंदांची वेळ नोंदवली. (वृत्तसंस्था)

Web Title: India's special "success" in Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.