मानांकनात भारताची घसरण, टी-२०त दुसऱ्या तर वन डेत चौथ्या स्थानावर

By Admin | Updated: May 4, 2016 20:58 IST2016-05-04T20:58:44+5:302016-05-04T20:58:44+5:30

आयसीसीच्या टी-२० क्रिकेट मानांकनात भारतीय क्रिकेट संघ अव्वल स्थानावरुन दुसऱ्या तर वन डे मानांकनात चौथ्या स्थानावर घसरला

India's slump in the rankings, second in T20, and fourth place in ODI team | मानांकनात भारताची घसरण, टी-२०त दुसऱ्या तर वन डेत चौथ्या स्थानावर

मानांकनात भारताची घसरण, टी-२०त दुसऱ्या तर वन डेत चौथ्या स्थानावर

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 4 -  आयसीसीच्या टी-२० क्रिकेट मानांकनात भारतीय क्रिकेट संघ अव्वल स्थानावरुन दुसऱ्या तर वन डे मानांकनात चौथ्या स्थानावर घसरला आहे. टी-२० मध्ये भारत आता न्यूझीलंडनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. वन डे मानांकनात आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी मेलबर्नमध्ये पाचवा विश्वचषक जिंकणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाचे १२४ गुण आहेत. ते न्यूझीलंडच्या ११ गुणांनी पुढे आहेत. दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. वेस्ट इंडिजने पाकिस्तानला मागे टाकले असून त्यांनी अव्वल आठ संघांत स्थान मिळवले आहे.
इंग्लंडने दोन स्थानांची प्रगती केली असून ते आता सहाव्या तर बांगलादेश सातव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज संघ आठव्या तर अफगाणिस्तान दहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंड आणि पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये एकदिवसीय मानांकनात अव्वल सात संघांना विश्वचषकात सरळ प्रवेश मिळणार आहे. तर तळातील चार संघांना आयसीसी विश्वचषक लीगच्या अव्वल संघांविरुद्ध पात्रता फेरी खेळावी लागेल.

Web Title: India's slump in the rankings, second in T20, and fourth place in ODI team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.