आयसीसी क्रमावरीत भारताची घसरण, विराट कोहली दुस-या स्थानावर
By Admin | Updated: September 23, 2016 20:24 IST2016-09-23T20:24:07+5:302016-09-23T20:24:07+5:30
गेले काही दिवस एकदिवसीय सामन्यांपासून दूर असलेल्या भारतीय संघाची आयसीसी क्रमवारीत तिस-या स्थानावर घसरण झाली आहे

आयसीसी क्रमावरीत भारताची घसरण, विराट कोहली दुस-या स्थानावर
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 23 - गेले काही दिवस एकदिवसीय सामन्यांपासून दूर असलेल्या भारतीय संघाची आयसीसी क्रमवारीत तिस-या स्थानावर घसरण झाली आहे. तर फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने दुस-या क्रमांकावर आपले स्थान नक्की केलं. आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी शुक्रवारी जाहीर केली. भारत 110 गुणांसोबत तिस-या क्रमांकावर असून ऑस्ट्रेलिया 124 गुणांसहित पहिल्या आणि न्यूझीलंड 113 गुणांसहित दुस-या क्रमांकावर आहेत.
विराट कोहलीच्या खात्यात 813 गुण जमा असून दक्षिण अफ्रिकेचा ऑलराऊंडर ए बी डेव्हिलिअर्स पहिल्या क्रमांकावर आहे. अनुभवी हाशीम अमलाला विराट कोहलीने क्रमवारीत मागे टाकलं आहे. विराट कोहली व्यतिरिक्त भारतीय संघातील रोहीत शर्मा सातव्या आणि शिखर धवन आठव्या स्थानावर आहेत. गोलंदाज आणि ऑलराऊंडरच्या क्रमवारीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश झालेला नाही.