नवी दिल्ली : यजमान भारताने चमकदार कामगिरी करताना विश्वकप स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या हॉलंडविरुद्ध मंगळवारी 3-2 ने सनसनाटी विजय मिळविला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पहिला विजय नोंदविला. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारताने ‘ब’ गटात जर्मनी व अर्जेटिनाविरुद्ध पत्करावे लागलेले पराभव विसरून आज सनसनाटी विजय नोंदविला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाने दुस:या स्थानावर असलेल्या हॉलंडविरुद्ध विजय मिळविताना प्रतिस्पर्धी संघांना आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नका, असा इशारा दिला आहे.
एस. सुनील (33 वा मि.), मनप्रीत सिंग (47 वा मि.) आणि रूपिंदरपाल सिंग (49 वा मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हॉलंडतर्फे मिंक वीरडेन वान डेरने (36 व 58 वा मि.) दोन गोल नोंदविले. मनप्रीत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारताने या विजयासह ‘ब’ गटात तिसरे स्थान पटकाविले आहे. भारताला गुरुवारी बाद फेरीच्या लढतीत ‘अ’ गटातील दुस:या स्थानावरील बेल्जियमच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या पराभवानंतरही हॉलंडने गटात अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यांची उपांत्यपूर्व फेरीत गाठ ‘अ’ गटातील चौथ्या स्थानावरील पाकिस्तानविरुद्ध पडणार आहे. त्याचप्रमाणो इंग्लंड व जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया व अर्जेटिना संघांदरम्यान उपांत्यपूर्व फेरीच्या लढती रंगणार आहेत.
अर्जेंटिनाकडून जर्मनी पराभूत
अर्जेटिनाने ‘ब’ गटाच्या मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत जर्मनीचा 3-क् ने सहज पराभव केला. अर्जेटिनच्या 18 व्या मि. मातियास पारिडेसने गोल करून अर्जेटिनाचे खाते उघडले. जोआकिन मिनिनीने 25 व्या मि. चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत संघाला 2-क् अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 49 व्या मिनिटाला इगनासियो ओर्टिजने पुन्हा एक गोल नोंदवीत अर्जेटिना संघाला 3-क् ने विजय मिळवून दिला.(वृत्तसंस्था)
इंग्लंड-बेल्जियम
लढत बरोबरीत
स्पर्धेत ‘अ’ गटात इंग्लंड व बेल्जियम यांच्या दरम्याची लढत 1-1 ने बरोबरीत संपली. बेल्जियमच्या इमाउरी कियूस्टर्सने नवव्या मि. मैदानी गोल नोंदवत आपल्या संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. इंग्लंडतर्फे तिस:या क्वार्टरमध्ये लेन लियुर्सने 48 व्या मि.बरोबरी साधणारा गोल नोंदविला.