कसोटी क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
By Admin | Updated: May 3, 2016 19:45 IST2016-05-03T18:26:56+5:302016-05-03T19:45:50+5:30
आज जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी क्रमावारीमध्ये भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. आयसीसीने आपली वार्षिक क्रमवारी आज जाहीर केली

कसोटी क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - भारतीय संघावर सहा गुणांनी आघाडी घेत आॅस्ट्रेलियाने आयसीसी कसोटी मानांकनात अव्वलस्थानी झेप घेतली आहे. आता भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत पाकिस्तानच्या केवळ एका गुणाने पुढे आहे. पाकिस्तानला वार्षिक अपडेटचा फायदा झाला; कारण त्यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१२-१३ मध्ये झालेल्या पराभवाचा विचार करण्यात आला नाही, तर २०१४-१५ मधील श्रीलंकेकडून झालेल्या ०-२ अशा पराभवाचा केवळ ५० टक्के फरक पडला आहे.
वार्षिक अपडेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघ १७ गुणांनी मागे असला तरी ते तिसऱ्या स्थानावरुन सहाव्या स्थानी घसरले आहेत. वार्षिक अपडेटचा वेस्ट इंडिजवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. ते आठव्या स्थानी पोहचले. मात्र, त्यांचे गुण ७६ वरून ६५ झाले आहेत; कारण त्यांनी न्यूझीलंड, बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध २०१२ आणि २०१३ मध्ये मिळवलेल्या विजयाचे गुण त्यातून वगळण्यात आले आहेत. बांगलादेश संघ नवव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील २९ गुणांचे अंतर आता केवळ ८ गुणांवर आले आहे.