भारताचा दुसरा दिवस पदकाविना

By Admin | Updated: February 26, 2017 04:06 IST2017-02-26T04:06:22+5:302017-02-26T04:06:22+5:30

भारतीय नेमबाजांना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पदक पटकावता आले नाही. जोरावरसिंग संधू व नीरजकुमार यांनी

India's second day without medal | भारताचा दुसरा दिवस पदकाविना

भारताचा दुसरा दिवस पदकाविना

नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पदक पटकावता आले नाही. जोरावरसिंग संधू व नीरजकुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या ट्रॅप व २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीमध्ये निराशा केली.
पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेच्या पात्रता गटात जोरावर संधू ११८च्या स्कोअरसह चौथ्या स्थानी राहिला. त्याने अखेरच्या फेरीत ३५ व २८ असा स्कोअर नोंदवला, तर क्वॉलिफिकेशनच्या ५ सिरीजमध्ये २५ पैकी २३, २४, २३, २४ आणि २४ अशा गुणांची नोंद केली. जोरावर कांस्यपदकाच्या शर्यतीत होता; पण ३०व्या शॉटमध्ये त्याला लक्ष्याचा वेध घेता आला नाही. त्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले.
माजी विश्वकप व आशियाई स्पर्धेतील पदकविजेता रंजन सोढी याचा लहान भाऊ बीरेनदीप सोढी ट्रॅपच्या पात्रता फेरीत ३३व्या स्थानी राहिला. विश्वकप स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीसाठी पात्रता गाठणाऱ्या नीरजला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. गुरप्रीतसिंग व हरप्रीतसिंग पात्रता फेरीतच गारद झाले. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत एकाही भारतीयाला अंतिम फेरी गाठता आली नाही. (वृत्तसंस्था)


पुरुषांच्या १० मीटर फायनलमध्ये दीपक कुमार पाचव्या स्थानी राहिला, तर मेघना सज्जनार पात्रता फेरीत १०व्या स्थानी होती. ट्रॅप स्पर्धेत इटलीची सिमोन एम्ब्रोसियोने विश्वविक्रमासह सुवर्ण पटकावले. जियोवान्नी पेलियेलोने रौप्य, तर स्पेनच्या अलबर्टो फर्नांडिसने कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुलमध्ये चीनच्या जियेजी लाओने सुवर्ण आणि जुनमिन लीनने रौप्यपदक पटकावले. अजरबैजानच्या रुस्लान लुनेव्हला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक फायनलमध्ये चीनच्या बुहान सोंग व मिंगयांग वू यांनी सुवर्णपदक पटकावले. जपानच्या अत्सुशी शिमाडा व अयानो शिमिझू दुसऱ्या, तर चीनचे मेंग्याओ शी व गेंगचेंग सुई तिसऱ्या स्थानावर राहिले. (वृत्तसंस्था)

Web Title: India's second day without medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.