भारताचा साकेत मायनेनी उपांत्य फेरीत
By Admin | Updated: October 24, 2014 03:17 IST2014-10-24T03:17:29+5:302014-10-24T03:17:29+5:30
इंदोर एटीपी स्पर्धेतील विजेता भारताच्या साकेत मायनोनीने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आपल्या प्रतिस्पर्धांचा पराभव

भारताचा साकेत मायनेनी उपांत्य फेरीत
पुणे : इंदोर एटीपी स्पर्धेतील विजेता भारताच्या साकेत मायनोनीने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आपल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करुन ५० हजार डॉलर एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत व दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने श्री शिवछत्रलती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत बिरगमानांकित व भारताच्या साकेत मायनेनीने दोन आठवड्यांमध्ये कझाकिस्तानच्या अव्वल मानांकित ओलक्झांडर नेदोव्हिएसोवला दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. १ तास ४ मिनिटे चाललेल्या लढतीत साकेतने ओलक्झांडरचे आव्हान ६-३, ६-४ असे मोडीत काढून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. तुफानी सर्व्हिसच्या जोरावर साकेतने ओलक्झांडरची पहिल्या सेटमध्ये चौथ्या गेममध्ये व दुसऱ्या सेटमध्ये १०व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली. (क्रीडा प्रतिनिधी)