विजयाचा दबाव भारतावरच

By Admin | Updated: August 7, 2014 00:13 IST2014-08-07T00:13:35+5:302014-08-07T00:13:35+5:30

चौथ्या कसोटीत विजय मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधणा:या इंग्लंडचे मनोबल मागच्या विजयामुळे उंचावले आहे,

India's pressure of victory | विजयाचा दबाव भारतावरच

विजयाचा दबाव भारतावरच

 इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी आजपासून : भुवनेश्वर फिट, गंभीर खेळण्याची शक्यता

 
खेळाडूंच्या निवडीचा दबाव आणि यजमान संघासोबत उडालेले खटके यांचा दुहेरी अडथळा सोबत घेऊन खेळणा:या भारतीय संघाला उद्या (गुरुवार)पासून येथे सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटीत विजय मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल.
मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधणा:या इंग्लंडचे मनोबल मागच्या विजयामुळे उंचावले आहे, तर दुसरीकडे पराभवानंतर जडेजा प्रकरणात न्याय न मिळाल्याने दुखावलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा कर्णधार आणि आधारस्तंभ असलेल्या महेंद्रसिंह धोनीवरही मोठा दबाव आहे. मागच्या सामन्यात शिखर धवन, विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यासारख्या सिनिअर्सची कामगिरी केविलवाणी ठरली. दुसरीकडे, गंभीर आणि आश्विनसारख्यांना अद्यापही संधी देण्यात आलेली नाही. चौथ्या सामन्यात शिखरऐवजी गंभीरला संधी द्यावी काय, हा धोनीपुढील यक्षप्रश्न असेल. 
या सामन्यात ऑफ स्पिनर आश्विनला संधी मिळू शकते; पण तो रोहित शर्मा की जडेजाचे स्थान घेईल, हे अद्याप ठरलेले नाही. रोहितने साऊदम्प्टन सामन्यात चुकीचे फटके मारले. जडेजाला या सामन्यात अधिक संधी मिळाली नव्हती; पण पहिल्या दोन सामन्यांप्रमाणो धोनी पाच फलंदाजांचा फॉम्यरुला कायम राखेल, असाही कयास लावला जात आहे.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला नाही. भारताने येथे इंग्लंडला कधीही हरविलेले नाही. या मैदानावर झालेल्या आठपैकी तीन सामन्यांत इंग्लंड विजयी ठरला, तर पाच सामने अनिर्णीत राहिले. ट्रेंटब्रिजची खेळपट्टी भारताला, तर साऊदम्प्टनची खेळपट्टी इंग्लंडला पूरक ठरली. या खेळपट्टीवर हिरवे गवत असल्याने गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अशा वेळी कुठला संघ अधिक प्रभावी मारा करतो, यावर विजयाचे समीकरण अवलंबून असेल. कारकिर्दीत सवरेत्कृष्ट कामगिरी करणारा ईशांत शर्मा जखमेतून सावरलेला नाही. भुवनेश्वर कुमारदेखील घोटय़ाच्या दुखापतीने त्रस्त आहे. तो मैदानावर परत येईल काय, हेदेखील निश्चित नसल्याने पाचवा गोलंदाज कोण, हे चित्र धूसर आहे.  पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत असलेल्या भारताने मागच्या पराभवातून धडा घेतला. त्याचे संकेत सरावातून मिळाले. सरावाच्या वेळी धवनने घाम गाळला, तर मुरली विजय स्लिपमध्ये ङोल टिपण्याच्या तयारीला लागला. याशिवाय, गंभीरचा संघात समावेश होण्याचीही चिन्हे आहेत. 2क्12पासून तो कसोटी सामना खेळलेला नाही. याशिवाय, चेतेश्वर पुजारा सलामीलाच येईल. दुसरा बदल म्हणजे रोहितला संघात कायम ठेवून शिखरऐवजी आश्विनला स्थान देण्यात येईल. धवनने आतार्पयत 12, 29, 7, 31, 6 आणि 37 धावा केल्या. विराटची कामगिरी काहीशी अशीच आहे. त्याने मागच्या सामन्यात 39 आणि 28 धावांची भर घातली. 
इंग्लंडला कर्णधार अॅलिस्टर कुक आणि इयान बेल यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा असतील. तिस:या कसोटीत पदार्पण करणा:या ज्योस बटलरने 85 धावा ठोकून संकेत दिले. कर्णधार कुकला सूर गवसला, तर इंग्लंड धावांचा डोंगर उभारू शकतो. गोलंदाज जेम्स अँडरसन जेडजाविरुद्धच्या भांडणानंतर आणखीच आक्रमक झाला. त्याने मागच्या सामन्यात 7, तर मोईन अली याने 8 गडी बाद केले. एकूणच, या सामन्यात इंग्लंडचे पारडे जड होते. त्याचा लाभ चौथ्या सामन्यातही मिळविण्याचा यजमान संघाचा प्रय} राहील, तर भारताला कसोटी जिंकायची आहे. या सामन्यातील निकालावर मालिकेचा निकालही विसंबून असल्याने भारतासाठी ‘करा किंवा मरा’ अशीच स्थिती आहे.
 
1मॅँचेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारतीय संघाला आतार्पयत विजयाचे खाते उघडता आलेले नाही. गुरुवारपासून सुरू होणा:या सामन्यात भारतीय संघ ऐतिहासिक विजयाची प्रतीक्षा संपवणार काय, याकडे अनेकांचे लक्ष असेल. 
2तिस:या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवणा:या इंग्लंडने मात्र या मैदानावर पाहुण्या संघाविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. येथील आठ सामन्यांत त्यांनी तीन विजय नोंदवले आहेत. इतर पाचही सामने अनिर्णित राहिले. 
 
3 या मैदानावर भारतीय संघाची एका डावातील 58 ही धावसंख्या निच्चांकी आहे, जी 1958 मध्ये नोंदली गेली. दुसरीकडे, मैदानावरची इंग्लंडची 294 ही धावसंख्या सर्वात कमी आहे.
4मैदानावर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच्या 179 धावांच्या योगदानामुळे भारताने 199क् मध्ये 432 ही सर्वाधिक धावसंख्या गाठली होती.
5इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी येथे सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यात ज्यॉफ पुलर आणि माईक ऑथरटन यांच्या प्रत्येकी 131 धावांच्या खेळीचा समावेश आहे. 
 
4भारत विरुद्ध इंग्लंड मालिका उन्हाळ्यात अटीतटीची होत असताना, चौथ्या कसोटीत पाऊस ‘खलनायक ’ ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून ओल्ड ट्रॅफोर्टवर पावसाची सारखी हजेरी सुरू असून, सामन्याच्या दिवसांतही पाऊस कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
4उद्या गुरुवारचा अपवाद वगळता पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने खेळ किती होईल हे पाहणो रंजक ठरेल. पाच दिवस खेळ होईलच याची शाश्वती देणो कठीण मानले जात आहे.
4बुधवारी येथे रिमङिाम पाऊस झाला. काही वेळा पावसाचा वेग मुसळधारही होता. इंग्लंड संघाला मैदानावर सराव न करता आल्याने खेळाडूंनी इन्डोअर सराव केला. दुपारी 1 वाजता पाऊस थांबल्यानंतर मैदानावरील कर्मचा:यांनी साचलेले पाणी काढले.
4भारतीय खेळाडू मात्र दुपारनंतरच मैदानावर आले. त्या वेळी लख्ख ऊन होते. उन्हामुळे खेळपट्टीही सुकविण्यासाठी मोकळी करण्यात आली होती.
 
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणो, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, पंकज सिंग, वरुण अॅरोन.
इंग्लंड : अॅलिस्टर कुक (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, ािस जॉर्डन, जोस बटलर, सॅम राबसन, जो रुट, ािस वोक्स, स्टिव्ह फिन .

Web Title: India's pressure of victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.