भारताच्या प्रांजला, महक उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: May 4, 2016 21:21 IST2016-05-04T21:21:14+5:302016-05-04T21:21:14+5:30
मुलींच्या एकेरीत अनुक्रमे चीनच्या यान्नी लिऊ आणि जपानच्या अनरी नगाताचा पराभव करून आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला
भारताच्या प्रांजला, महक उपांत्यपूर्व फेरीत
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 4- भारताच्या प्रांजला येडलापल्ली व महक जैन यांनी मुलींच्या एकेरीत अनुक्रमे चीनच्या यान्नी लिऊ आणि जपानच्या अनरी नगाताचा पराभव करून आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथिल श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उप-उपांत्यपुर्व फेरीत भारताच्या व पाचव्या मानांकित सध्याचा जागतिक क्र.९४ असलेल्या प्रांजला येडलापल्ली हीने चीनच्या जागतिक क्र.२२९असलेल्या यान्नी लिऊचा ६-३, ३-६, ६-३ असा तीन सेटमध्ये संघर्षपुर्ण पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. हा सामना २ तास २०मिनिटे चालला. भारताच्या जागतिक क्र.१२० असलेल्या महक जैन हीने जपानच्या अनरी नगाताचा ७-५, ४-६, ६-३असा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत १४९व्या स्थानी असलेल्या झुओमा नी मा हीने जागतिक क्र.७२ असलेल्या व दुसऱ्या मानांकित मायुका एकवाचा ६-४, ६-३ असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. फिलिपिन्स्च्या किम इजलुपसने चीनच्या व चौथ्या मानांकित झिमा डुचा ६-३, ६-४ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. मुलांच्या गटात भारताच्या आदिल कल्याणपुरला फिलिपिन्स्च्या व दुसऱ्या मानांकित लिम अलबेर्टोकडून ३-६, २-६ असा पराभव पत्कारावा लागला. दुहेरीत मुलींच्या गटात भारताच्या महक जैन व स्रेहल माने यांनी जोलिता बुध्दीमान व प्रियाना कलिता यांचा ६-७(५), ६-२(१०-८)असा पराभव करून आगेकुच केली. निकाल : (उप-उपांत्यपुर्व फेरी) मुली: युकी नाईतो(जपान,१)वि.वि. जोलिता बुध्दीमान(इंडोनेशिया)६-0, ६-२; प्रांजला येडलापल्ली(भारत,५)वि.वि.यान्नी लिऊ(चीन)६-३, ३-६, ६-३; किम इजलुपस(फिलिपिन्स्)वि.वि.झिमा डु(चीन,४) ६-३, ६-४; नाहो सातो(८)वि.वि. निधी सुरापणेनी(भारत)६-२, ६-२; महक जैन(भारत)वि.वि.अनरी नगाता(जपान)७-५, ४-६, ६-३; झियु वांग(चीन)वि.वि.झील देसाई(भारत,३)६-३, ७-६(३); यांग ली(चीन,६)वि.वि. मी झुओमा यु २-६, ६-३, ६-२; झुओमा नी मा वि.वि. मायुका एकवा(जपान,२)६-४, ६-३; मुले: तोरू होरी(जपान,१)वि.वि.हॅन सिआॅन याँग(कोरिया)६-३, ७-६(२); टँग ए.(हाँगकाँग,७)वि.वि.ट्रॉटर जेम्स् केंट(जपान)६-४, ६-४; झाओ लिंगक्सी(चीन,४)वि.वि.शिनजी हजावा(जपान)६-२, ६-४; ताजिमा नाओकी(जपान,८)वि.वि.सेंग चुन सिन(तैपैई)६-३, ४-६, ७-६(४); लु चेंगझी(चीन,६)वि.वि.लाम चिंग(हाँगकाँग)६-२, ६-२; युता शिमीझु(जपान,३)वि.वि.व्ही राकपुआंचॉन(थायलंड)६-१, ६-१; वाय तनाका(जपान,५)वि.वि.मु ताओ(चीन)६-४, ६-४; लिम अलबेर्टो(फिलिपिन्स्,२)वि.वि.आदिल कल्याणपुर(भारत)६-३, ६-२; दुहेरी गट: मुले: उपांत्यपुर्व फेरी: होरी तारू/तनाका युनोसुकी वि.वि.सिध्दांत बांठिया/रिंपी कवाकामी ६-१, ७-५; युता शिमीझु/नाओकी ताजिमा वि.वि.व्होरॉचॉन राकपुआंचॉन/टँग अँथोनी जॅकी ६-३, ६-२; मुली दुहेरी : उप-उपांत्यपुर्व फेरी: झिमा डु(चीन)/युकी नाईतो(जपान)वि.वि.नाओमी हिगस्तानी/सुईनो सातोको(जपान)६-४, 0-६(१०-१); यान्नी लिऊ(चीन)/झियु वांग(चीन)वि.वि.एस. चिलकलापुडी/हुमेरा बेगम शेख(भारत)६-0, ६-0; रिफंती काफिआनी(इंडोनेशिया)/यांग लि(तैपैई)वि.वि.एस.भामिदिप्ती/आकांक्षा भान(भारत)६-३, ६-१; महक जैन/स्रेहल माने(भारत)वि.वि.जोलिता बुध्दीमान/प्रियाना कलिता(भारत)६-७(५), ६-२(१०-८); झुओमा निमा/मी झुओमा यु(चीन)वि.वि.शिवानी अमिनेनी/सभ्यता निहलानी(भारत)४-६, ७-५(१०-७); अनरी नगाता/नाहो सातो(जपान)वि.वि.वैदेही चौधरी/शिवानी इंगळे(भारत)६-२, ६-३; खिम इगलुपास/हिमारी सातो वि.वि.झील देसाई/निधी सुरापनेनी(भारत)२-६, ६-४(१३-११); मायुका एकावा(जपान)/प्रांजला येडलापल्ली(भारत)वि.वि.समा सात्विका/मिहिका यादव(भारत)६-४, ६-४. (क्रीडा प्रतिनिधी)