सरदारसिंगकडे भारताचे नेतृत्व
By Admin | Updated: November 5, 2015 02:44 IST2015-11-05T02:44:46+5:302015-11-05T02:44:46+5:30
आगामी २७ नोव्हेंबरपासून रायपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या आठ संघांच्या हिरो विश्व हॉकी लीग फायनल्ससाठी १८ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व सरदारसिंग करणार आहे. साई सेंटरमध्ये

सरदारसिंगकडे भारताचे नेतृत्व
बंगळुरू : आगामी २७ नोव्हेंबरपासून रायपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या आठ संघांच्या हिरो विश्व हॉकी लीग फायनल्ससाठी १८ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व सरदारसिंग करणार आहे. साई सेंटरमध्ये सुरू असलेल्या तयारी शिबिरादरम्यान संघ जाहीर करण्यात आला. गोलकिपर पी. आर. श्रीजेश उपकर्णधार असेल.
बचावफळीची जबाबदारी वीरेंद्र लाक्रा, कोथाजित, व्ही.आर. रघुनाथ, जसजीतसिंग कुलार आणि रुपिंदरपालसिंग हे सांभाळतील. सरदार, चिंग्लेनसानासिंग, देवेंद्र वाल्मिकी, मनप्रितसिंग, धरमवीरसिंग, आणि दानिश मुस्तफा हे मधल्या फळीत तसेच एस. व्ही. सुनील, रमणदीप, आकाशसिंग, ललित उपाध्याय व तलविंदरसिंग हे आक्रमक फळीत राहतील. भारताला १९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत राजनांदगाव येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका देखील खेळायची आहे.भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात १९, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी लढती होतील.
भारतीय संघ : गोलकिपर : पी.आर. श्रीजेश, हरज्योतसिंग. बचावफळी : बीरेंद्र लाक्रा, कोथाजीतसिंग, व्ही.आर. रघुनाथ, जसजीतसिंग कुलार, रुपिंदर पालसिंग. मधलीफळी : सरदारसिंग (कर्णधार), चिंग्लेनसानासिंग, देवेंद्र वाल्मिकी, मनप्रीतसिंग, धरमवीरसिंग, दानिश मुस्तफा, आक्रमक फळी : एस.व्ही. सुनील, रमणदीपसिंग, आकाशदीपसिंग, ललित उपाध्याय, तलविंदरसिंग. (वृत्तसंस्था)
रिओसाठी पुर्वपरीक्षा
संघाचे मुख्य कोच आणि हायपरफॉर्मन्स मॅनेजर रोलॅन्ट ओल्टमन्स म्हणाले, ‘संघ एकत्र असल्याने खेळ सुधारला आहे. संघातील कच्चे दुवे आणि बलस्थानेदेखील खेळाडूंना समजली आहेत.’
हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले, ‘हॉकी विश्व लीग फायनल पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकच्या दृष्टीने आमची पहिली परीक्षा असेल. सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध खेळताना आमचे स्थान कुठे आहे, याचा वेध यातून घेता येईल.’