शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
8
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
9
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
10
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
11
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
12
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
13
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
14
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
15
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
16
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
17
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
18
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
19
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
20
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"

भारताच्या आशा कायम

By admin | Updated: March 7, 2017 00:36 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी घेत आशा कायम राखल्या

बंगळुरू : चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने सोमवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी घेत आशा कायम राखल्या. सोमवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी भारताने दुसऱ्या डावात ४ बाद २१३ धावांची मजल मारली होती. भंगणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघ आता आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताने आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांत गुंडाळला. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने ६३ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत आॅस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.मालिकेत प्रथमच भारताने विकेट न गमावता एक सत्र खेळून काढले. राहुल व पुजाराची जोडी लियोनने फोडली. पहिल्या स्लिपमध्ये तैनात आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने अप्रतिम झेल टिपत राहुलची खेळी संपुष्टात आणली. राहुलने अर्धशतकी खेळीदरम्यान कसोटी कारकिर्दीत एक हजार धावांचा पल्ला गाठला. रहाणेने दडपणाखाली आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाची खेळी केली. भारताची ४ बाद १२० अशी अवस्था असताना पुजाराला साथ देण्यासाठी रहाणे खेळपट्टीवर आला. या जोडीने फटके खेळताना सावधगिरी बाळगली. त्यांनी एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर भर दिला. या दोघांनी फिरकीपटू नॅथन लियोन (६९ धावांत बळी नाही) आणि स्टीव्ह ओकीफे (२८ धावांत १ बळी) यांचा मारा समर्थपणे खेळून काढला. आॅस्ट्रेलियातर्फे जोश हेजलवुड (३-५७) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने अभिनव मुकुंद (१६) व रवींद्र जडेजा (२) यांना क्लीन बोल्ड केले. भारतीय कर्णधार विराट कोहली (१५) पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरला. मैदानी पंच नायजेल लाँग यांनी चहापानाला पाच षटकांचा अवधी शिल्लक असताना हेजलवुडच्या गोलंदाजीवर त्याला पायचित बाद दिले. कोहलीने चेंडू बॅटला लागल्याचा इशारा करताना डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. टीव्ही पंच रिचर्ड केटलबोरोने यांनी चेंडू प्रथम बॅटला लागला की पॅडला हे स्पष्ट होत नसल्याचे सांगताना मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. कोहलीने मैदान सोडताना नाराजी व्यक्त केली. कोहली पहिल्या कसोटी सामन्यात शून्य व १३ धावा काढून बाद झाला होता, तर या कसोटीत पहिल्या डावात १२ धावांवर बाद झाला. त्याआधी, सकाळच्या सत्रात जडेजाने १० चेंडूंमध्ये तीन बळी घेत आॅस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना झटपट माघारी परतवले. भारताने आॅस्ट्रेलियाचा डाव २७६ धावांत गुंडाळला. रविचंद्रन आश्विनने (२-८४) सर्वप्रथम स्टार्कला (२६) माघारी परतवले. त्यानंतर जडेजाने (६-६३) मॅथ्यू वेड (४०), नॅथन लियोन (००) आणि हेजलवुड (०१) यांना बाद केले. फलंदाजीसाठी खडतर असलेल्या या खेळपट्टीवर आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. (वृत्तसंस्था)>पुजारा, राहुल, रहाणेची लढवय्या खेळी पुजाराने लढवय्या खेळी केली, तर सलामीवीर लोकेश राहुलने (५१) या लढतीत सलग दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावताना महत्त्वाचे योगदान दिले. या कसोटीत पुजारा व अजिंक्य रहाणे (नाबाद ४०) यांनी पाचव्या विकेटसाठी केलेली ९३ धावांची अभेद्य भागीदारी निर्णायक ठरू शकते.पुजाराने १७३ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार लगावले, तर रहाणेने १०५ चेंडूंमध्ये ३ चौकार मारले. राहुलने चमकदार फलंदाजी करताना ८५ चेंडूंमध्ये चार चौकार ठोकले. त्याने वेगवान गोलंदाज व फिरकीपटूंना समर्थपणे तोंड दिले.>धावफलकभारत पहिला डाव : १८९. आॅस्ट्रेलिया पहिला डाव : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. आश्विन ३३, मॅट रेनशॉ यष्टिचीत साहा गो. जडेजा ६०, स्टीव्ह स्मिथ झे. साहा गो. जडेजा ८, शॉन मार्श झे. नायर गो. यादव ६६, पीटर हँड्सकोम्ब झे. आश्विन गो. जडेजा १६, मिशेल मार्श पायचीत गो. ईशांत ०, मॅथ्यू वेड पायचित गो. जडेजा ४०, मिशेल स्टार्क झे. जडेजा गो. आश्विन २६, स्टीव्ह ओकिफी नाबाद ४, नाथन लियोन पायचित गो. जडेजा ०, जोश हेजलवूड झे. राहुल गो. जडेजा १. अवांतर : २२. एकूण : १२२.४ षटकांत सर्व बाद २७६. बाद क्रम : १-५२, २-८२, ३-१३४, ४-१६०, ५-१६३, ६-२२०, ७-२६९, ८-२७४, ९-२७४. गोलंदाजी : ईशांत शर्मा २७-८-४८-१, उमेश यादव २४-७-५७-१, आश्विन ४९-१३-८४-२, जडेजा २१.४-१-६३-६, नायर १-०-७-०. भारत दुसरा डाव :- लोकेश राहुल झे. स्मिथ गो. ओकिफी ५१, अभिनव मुकुंद त्रि. गो. हेजलवूड १६, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ७९, विराट कोहली पायचीत गो. हेजलवूड १५, रवींद्र जडेजा त्रि. गो. हेजलवूड २, अजिंक्य रहाणे खेळत आहे ४०. अवांतर : १०. एकूण ७२ षटकांत ४ बाद २१३. बाद क्रम : १-३९, २-८४, ३-११२, ४-१२०. गोलंदाजी : स्टार्क १०-०-४५-०, हेजलवूड १६-०-५७-३, लियोन २७-२-६९-०, ओकिफी १६-३-२८-१, मिशेल मार्श ३-०-४-०.