शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
4
आरोग्य विमा की मेडीक्लेम? गंभीर आजार, ओपीडी आणि मॅटर्निटी कव्हरेज कशात मिळते, दोन्हीत किती फरक?
5
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
6
सात युद्धे थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाहीच; कुणाला मिळाला 'शांतता पुरस्कार'
7
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
8
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
9
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
10
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
11
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
12
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
13
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
14
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
15
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
16
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
17
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
18
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
19
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
20
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?

भारताची ऐतिहासिक कामगिरी

By admin | Updated: July 11, 2017 01:59 IST

गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. यंदा अव्वल खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे स्पर्धेला ग्लॅमर कमी मिळाले

भुवनेश्वर : यजमान भारताने २२ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अजिंक्य कामगिरी करताना पहिल्यांदाच गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. यंदा अव्वल खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे स्पर्धेला ग्लॅमर कमी मिळाले. भारताने या वेळी लक्षवेधी कामगिरी करताना बलाढ्य चीनच्या वर्चस्वाला धक्का दिला. दखल घेण्याची बाब म्हणजे १९८३ पासून या स्पर्धेत कायम अग्रस्थानी राहिलेल्या चीनची यंदा भारताच्या धडाक्यापुढे पीछेहाट झाली. या स्पर्धेत भारताने विक्रमी पदकांची कमाई करताना १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि १२ कांस्य अशी २९ पदकांची लयलूट केली. सहा जुलैला सुरू झालेल्या या चारदिवसीय स्पर्धेत भारताने पहिल्या दिवसापासून राखलेले वर्चस्व अखेरच्या दिवसापर्यंत कायम राखताना बाजी मारली. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही काही स्टार्स खेळाडूंनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली असल्याने त्याचा काहीसा फरक स्पर्धेवर नक्कीच पडला. लंडनमध्ये होत असलेल्या आगामी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या तयारीसाठी चीन, जपान, कतार आणि बहारिनच्या काही अव्वल खेळाडूंनी आशियाई स्पर्धेतून आधीच माघार घेतली होती. या स्पर्धेत ४३ देशांतील एकूण ५६२ अ‍ॅथलिट्स सहभागी झाले होते. दरम्यान, स्पर्धा समारोपाच्या दिवशी आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष दहलान अल हमद यांनी ओडिशा सरकार आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे आभार व्यक्त करताना म्हटले की, ‘‘स्पर्धा शानदारपणे पार पडली. तुम्ही स्पर्धेचा स्तर आणखी वाढवला.’’ (वृत्तसंस्था)>पदकविजेत्यांचा गौरवओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील भारताच्या सर्व पदकविजेत्यांना रोख पुरस्कार देऊन त्यांचा सम्मान केला. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना १० लाख, तर रौप्य आणि कांस्यविजेत्यांना अनुक्रमे ७ व ५ लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा समारोप झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी कलिंग स्टेडियमवर झालेल्या विशेष कार्यक्रमादरम्यान पटनायक यांनी पदकविजेत्या खेळाडूंचा सम्मान केला. या वेळी भालाफेक सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राने म्हटले, ‘मुख्यमंत्री पटनायक यांच्याद्वारे झालेल्या सम्मानाने मी खूप आनंदी आहे. या आर्थिक पुरस्काराचा मला पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी खूप फायदा होईल. मी कलिंग स्टेडियमला कधीच विसरू शकत नाही.’ >वातावरणाचा परिणामया स्पर्धेदरम्यान राहिलेल्या उष्ण व दमट वातावरणाचा खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम झाला. स्पर्धेच्या चार दिवसांदरम्यान केवळे एकच मीट रेकॉर्ड नोंदला गेला. भारतीय संघाचा कर्णधार आणि स्टार भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने हा विक्रम रचला. भारताने कामगिरी उंचावली...स्पर्धेत यजमान भारताने चांगलेच वर्चस्व राखले. स्पर्धा इतिहासात आजपर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी करताना भारतीयांनी सुपरपॉवर चीनला नमवले. या वर्षी भारताने आपला सर्वाधिक ९४ खेळाडूंचा चमू स्पर्धेत उतरवला होता. याआधी जकार्ता १९८५ च्या स्पर्धेत भारताने २२ पदके मिळवत चांगली कामगिरी केली होती. तो विक्रम या वेळी भारतीयांनी मोडला. आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी, देशासाठी गर्वाची बाब, सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि शुभेच्छा.- विजय गोयल, केंद्रीय क्रीडामंत्रीभारताला अव्वल स्थानी आणल्याबद्दल सर्व अ‍ॅथलिट्सचे अभिनंदन. सर्वांचा खूप गर्व आहे. - वीरेंद्र सेहवाग,माजी क्रिकेटपटू