भारताचा शानदार विजय
By Admin | Updated: November 19, 2014 23:41 IST2014-11-19T23:41:18+5:302014-11-19T23:41:18+5:30
हरमनप्रित कौरच्या (४ बळी) सुरेख गोलंदाजच्या बळावर दक्षिण आफ्रिका महिला संघाला

भारताचा शानदार विजय
म्हैसूर : हरमनप्रित कौरच्या (४ बळी) सुरेख गोलंदाजच्या बळावर दक्षिण आफ्रिका महिला संघाला दुस-या डावात १३२ धावांत गुंडाळून भारतीय महिला संघाने एकमेव कसोटी सामन्यांत चौथ्या दिवशी १ डाव आणि ३४ धावांनी शानदार विजय मिळविला़
संघाच्या विजयात विशेष योगदान देणाऱ्या हरमनप्रितने २५़२ षटकांत ४१ धावा देत ४ विकेट मिळविल्या़ विशेष म्हणजे हरमनप्रितने पहिल्या डावातही ५ विकेट घेतल्या होत्या़ भारताकडून झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले़
त्याआधी आफ्रिकेने चौथ्या दिवशी ६ बाद ८३ या स्कोअरपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि हा संघ ७८़२ षटकांत १३२ धावांत तंबूत परतला़ त्यांच्याकडून तृषा चेट्टी हिने सर्वाधिक ३५ धावा केल्या़ सी ट्रायोन ३० धावांवर नाबाद राहिली़ इतर तळाच्या खेळाडूंनी केवळ खेळपट्टीवर हजेरी लावली़
भारताने आपला पहिला डाव ६ बाद ४०० धावांवर घोषित केला होता़ प्रत्युत्तरात आफ्रिकेने पहिल्या डावात ११० षटकांत
२३३ धावांपर्यंत मजल मारली होती़ दुसऱ्या डावात हा संघ १३२ धावांत ढेर झाला़ त्याआधी भारताच्या पहिल्या डावात थिरूष कामिनी हिने १९२ आणि पूनम राऊत हिने १३० धावांची खेळी करीत संघाला ४०० चा टप्पा पार करून दिला होता़ हरमनप्रितने सामन्यांत एकूण ९ बळी घेतले़ (वृत्तसंस्था)