भारताची शानदार सलामी

By Admin | Updated: September 5, 2015 23:56 IST2015-09-05T23:56:07+5:302015-09-05T23:56:07+5:30

भारताने सातव्या महिला ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना उत्तर कोरियाचा १३-० ने धुव्वा उडवला.

India's great salute | भारताची शानदार सलामी

भारताची शानदार सलामी

आशिया कप हॉकी : उत्तर कोरियावर १३-० ने मात

चांगझू : भारताने सातव्या महिला ज्युनिअर आशिया कप हॉकी स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना उत्तर कोरियाचा १३-० ने धुव्वा उडवला.
प्रीती दुबेने ११व्या मि. गोल नोंदवून भारताचे खाते उघडले, तर जसप्रीत कौरने २०व्या मि. पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. भारतातर्फे तिसरा गोल २४व्या मिनिटाला नवनीत कौर हिने केला, तर कर्णधार राणी रामपालने २८व्या मि. गोल नोंदवून संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. लिलीने त्याने ३१व्या मि. गोल नोंदविला, तर पूनम बार्लाने पुन्हा एक गोल नोंदवून संघाला मध्यंतरापर्यंत ६-० अशी आघाडी मिळवून दिली. भारताने दुसऱ्या हाफमध्ये सात गोल नोंदवले. राणीने ४३, ४४ व ४६व्या मिनिटांना गोल नोंदवून हॅट््ट्रिक पूर्ण केली आणि भारताला ९-० अशी आघाडी मिळवून दिली. लिलिमा मिंजने ५१व्या मिनिटाला शानदार मैदानी गोल नोंदविला, तर भारताने ५२, ६४ व ७०व्या मिनिटांना गोल नोंदवून संघाला १३-० ने विजय मिळवून दिला.
(वृत्तसंस्था)

Web Title: India's great salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.