शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर कालवश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 09:29 IST

Nandu Natekar: नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमधील १५ वर्षांच्या कारकीर्दीत १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे जिंकली होती.

मुंबई - परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांनी एक पत्रक प्रसिद्ध करून दिली आहे. नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमधील १५ वर्षांच्या कारकीर्दीत १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे जिंकली होती. (India's great badminton player Nandu Natekar passed away)

नंदू नाटेकर यांच्या निधनाची माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अत्यंत दु:खद अंतकरणाने आम्ही तुम्हाला माहिती देतो की, आमचे प्रिय वडील नंदू नाटेकर यांचे आज २८ जुलै २०२१ रोजी निधन झाले आहे. सध्या लागू असलेल्या कोरोनाच्या नियमावलीमुळे आम्ही शोकसभेचे आयोजन केलेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तसेच नंदू नाटेकर यांच्यााबाबत काही विचार आणि आठवणी तुम्हाला मांडायच्या असतील तर कृपया nandumnatekar@gmail.com या मेल आय़डीवर ईमेल करा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

१२ मे १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे जन्मलेल्या नंदकुमार नाटेकर यांनी भारताला बॅडमिंटनमध्ये अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले होते. बॅडमिंटनमध्ये भारताला परदेशात विजेतेपद मिळवून देणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. त्यांनी १९५६ मध्ये क्वालालंपूर येथील सेलांगोर इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून तेव्हा ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.

नंदू नाटेकर यांनी १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावली होती. तसेच त्यांनी प्रत्येकी सहावेळी पुरुष एकेरी आणि दुहेरीचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. तसेच पाच वेळा मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर कब्जा केला होता. 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र