शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

भारताचे स्वप्न भंगले

By admin | Updated: December 14, 2014 02:21 IST

रोमहर्षकतेच्या शिखरावर पोहोचलेली लढत जिंकण्यात यजमान भारताला अपयश येताच आपल्याच देशात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले.

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : पाकिस्तान 4-3 गोल विजयासह अंतिम फेरीत 
भुवनेश्वर : कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत- पाकिस्तान यांच्यातील रोमहर्षकतेच्या शिखरावर पोहोचलेली लढत जिंकण्यात यजमान भारताला अपयश येताच आपल्याच देशात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. 
शनिवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात पाककडून भारताचा 4-3 ने पराभव झाला. तीनवेळेचा चॅम्पियन पाकने 59 व्या नोंदविलेला चौथा गोल निर्णायक ठरताच पहिल्यांदा अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा देखील संपुष्टात आल्या. उद्या रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानपुढे आव्हान असेल ते जर्मनीचे.  प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या कलिंगा स्टेडियममध्ये उपस्थित भारतीय चाहत्यांची अखेरच्या काही मिनिटांत झालेल्या गोलमुळे पराभवाचा फटका बसल्याने घोर निराशा झाली. 
भारत 2क्12 मध्ये पाककडून तिस:या स्थानासाठी झालेल्या लढतीत पराभूत झाला होता. त्यापूर्वी 2क्क्2, 2क्क्3 आणि 2क्क्4 मध्येही तिस:या स्थानासाठींच्या लढतीत पाकने भारताला नमविले होते. भारताने इंचियोन आशियाडच्या अंतिम सामन्यात पाकचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करीत सुवर्ण जिंकले आणि रियो ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. पण आज पाकने भारताला त्यांच्यात चाहत्यांपुढे पराभवाची धूळ चारली. दुसरीकडे पाकने 1998 नंतर 16 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत 
धडक  दिली. 
अतिशय जलद गतीने खेळल्या गेलेल्या या लढतीत पाककडून मोहम्मद अर्सलान कादिर याने चौथा गोल केला. दोन गोल नोंदविणा:या कादिरचा सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. सामन्यात भारताने आघाडी मिळविली होती. 12 व्या मिनिटाला गुरजिंदरने हा गोल केला होता. पण कादिरने 18व्या मिनिटाला पाकला बरोबरी साधून दिली. मोहम्मद वकास याने तिस:या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवित पाकला आघाडी मिळवून दिली. धर्मवीरने  38व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल करीत सामना 2-2 असा बरोबरीत आणला होता. पाकला 44व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर मोहम्मद इरफानने गोल नोंदवित पाककडे आघाडी होती पण याच मिनिटाला तिमय्याने भारताकडून गोल करीत पुन्हा 3-3 ने बरोबरीत आणले. सामना संपायला दोन मिनिटांचा अवधी होता. त्याच वेळी कादिरने 59व्या मिनिटाला गोल नोंदवित मैदानात स्मशान शांतता पसरली. सामना गमविल्याचे शल्य मनात घेत भारतीय खेळाडूंनी खाली मान घालूनच स्टेडियम सोडले. भारताला उद्या रविवारी कांस्यपदकासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत द्यावी लागेल.           (वृत्तसंस्था)
 
पाकिस्तान-जर्मनी अंतिम लढत
पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनी संघाने विश्व चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाचा 3-2 गोलने पराभव करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. जर्मनीकडून त्रिमूरने 5 व्या, ग्रामूशने 9व्या व फ्लोरियनने 31व्या मिनिटाला गोल केले.