बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा डबल धमाका

By Admin | Updated: March 29, 2015 21:13 IST2015-03-29T20:35:18+5:302015-03-29T21:13:37+5:30

श्रीकांत किदम्बी व सायना नेहवाल या दोन्ही खेळाडूंनी बॅडमींटन स्पर्धेत विजय मिळवल्याने बॅडमिंटन चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

India's double explosion in badminton tournament | बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा डबल धमाका

बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा डबल धमाका

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - श्रीकांत किदम्बी व सायना नेहवाल या दोन्ही खेळाडूंनी बॅडमींटन स्पर्धेत विजय मिळवल्याने बॅडमिंटन चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
किदम्बी श्रीकांतने इंडिया ओपन सिरिजमध्ये डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलनवर १८-२१- २१-१३-२१-१२ अशी मात करत विजयावर शिक्का मोर्तब केली, तर सायना नेहवालने थायलंडच्या रॅचनॉक इंन्टॉनला २१- १४, २१- १६ ने  पराभूत केले. सायनाने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवल्याने तिच्या खेळाकडे बॅडमिंटन रसिकांचे विशेष लक्ष होते. तसेच उपांत्य फेरीत सायनासह  श्रीकांतनेही अंतिम फेरीत धडक मारल्याने बॅडमिंटन रसिकांच्या दोघांकडूनही अपेक्षा वाढल्या होत्या. चाहत्यांच्या अपेक्षा दोन्ही खेळाडूंनी पूर्ण करत 'इंडिया ओपन सुपर सिरिजवर' आपले नाव कोरले आहे. यापूर्वीच्या सामन्यात सायनाने जपानच्या युई हाशिमितोवर २१-१५, २१- ११ अशी मात करत पहिला खेळ जिंकला होता. तर, श्रीकांतने चीनच्या झ्यू सोंगवर २१- १३, २१-१६ अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली होती. 

 

Web Title: India's double explosion in badminton tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.