शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

मालिका विजयाचा भारताचा निर्धार

By admin | Updated: October 26, 2016 06:06 IST

गेल्या लढतीत चमकदार फलंदाजी करीत सूर गवसल्याचे सिद्ध करणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी न्यूझीलंडविरुद्ध गृहमैदानावर बुधवारी खेळल्या जाणाऱ्या चौथ्या वन-डे

रांची : गेल्या लढतीत चमकदार फलंदाजी करीत सूर गवसल्याचे सिद्ध करणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी न्यूझीलंडविरुद्ध गृहमैदानावर बुधवारी खेळल्या जाणाऱ्या चौथ्या वन-डे सामन्याच्यानिमित्ताने मालिका विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. फलंदाज, यष्टिरक्षक असलेल्या कॅप्टन कुल धोनीने मोहालीमध्ये गेल्या लढतीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. कोहलीसोबत त्याने तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करीत भारताच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. भारताने या लढतीत ७ गडी राखून विजय साकारला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. धोनीने ९१ चेंडूंना सामोरे जाताना ८० धावांची खेळी करीत वन-डे क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा पल्ला गाठला. तो ५० पेक्षा अधिक सरासरी राखणारा पहिला फलंदाज ठरला. वन-डे क्रिकेट संघाचा कर्णधार आणि रांचीचा लाडका पुत्र असलेला माही गृहमैदानावर कदाचित अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारताने या मैदानावर तीन वन-डे आणि एक टी-२० सामना जिंकलेला आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे लढतीत पावसामुळे निकाल शक्य झाला नव्हता.उपकर्णधार कोहलीने येथे दोन वन-डे लढतीत नाबाद ७७ व नाबाद १३९ धावा केल्या आहेत. कोहलीही या मैदानावर कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. मोहालीमध्ये डावाच्या सुरुवातीला सुदैवी ठरलेल्या कोहलीने १३४ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १५४ धावांची खेळी केली. कोहलीचे हे वन-डे कारकिर्दीतील २६ वे शतक होते. त्यात २२ वेळा भारत विजयी ठरला आहे. धोनीसोबत १५१ धावांच्या भागीदारीदरम्यान कोहली शानदार फॉर्मात असल्याचे दिसले. दुसरीकडे धोनीलाही जुनी लय गवसल्याचे दिसून आले. त्यामुळे धोनीचे जुने दिवस संपले, असे वक्तव्य करणे घाईचे ठरेल. क्रिकेटची धुळाक्षरे ज्या मैदानावर गिरवली त्या मैदानावर धोनी पुन्हा एकदा परतला आहे. त्याच्यासाठी हा एक भावनिक क्षण असेल. आयसीसीच्या प्रत्येक चषकावर नाव कोरणारा धोनी ही लढत संस्मरणीय ठरविण्यास उत्सुक आहे. धोनीला सूर गवसणे प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघासाठी धोक्याचे संकेत आहेत. कसोटी मालिकेत ०-३ ने पराभव स्वीकारणारा पाहुणा न्यूझीलंड संघ वन-डे मालिकेत लाज राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. कसोटी मालिकेतील तीन प्रमुख गोलंदाज आर. आश्विन, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना वन-डे मालिकेत विश्रांती दिल्यानंतरही भारतीय गोलंदाजांनी चमकदार गोलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघाला माफक धावसंख्येत रोखण्याची कामगिरी केली आहे. कामचलाऊ फिरकीपटू केदार जाधवने सहा बळी घेतले आहेत. जाधवने दिल्लीमध्ये ३७ चेंडूंना सामोरे जाताना ४१ धावा फटकावल्या. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी धोनीच्या नेतृत्वाखालील संघासाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरीने प्रभावित केले आहे. धर्मशालामध्ये शानदार पदार्पण केल्यानंतर त्याने दिल्लीमध्येही छाप सोडली होती. त्याने ३२ चेंडूंमध्ये ३६ धावांची खेळी केली होती. भारतासाठी एकमेव चिंतेचा विषय म्हणजे सलामीवीर रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांचा खराब फॉर्म. त्यांना या मालिकेत अद्याप संघाला चांगली सुरुवात करून देता आलेली नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना फलंदाजांकडून सांघिक कामगिरीची अपेक्षा आहे. टॉम लॅथम व कर्णधार केन विल्यम्सन यांचा अपवाद वगळता न्यूझीलंडचे अन्य फलंदाज धावा फटकावण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. मोहालीमध्ये वन-डे लढतीत तळाच्या फळीत जिम निशाम (५७) व मॅट हेन्री (नाबाद ३९) यांनी नवव्या विकेटसाठी ८४ धावांची विक्रमी भागीदारी करीत संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली होती. (वृत्तसंस्था)दिवाळीपूर्वी चाहत्यांना धोनीकडून ‘धूमधडाका’ अपेक्षितमहेंद्रसिंह धोनीसाठी बुधवारी कदाचित गृहमैदानावर अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो. त्यामुळे स्थानिक चाहत्यांना दिवाळीपूर्वी त्याच्याकडून शानदार खेळीची अपेक्षा आहे. मंगळवारी ऐच्छिक सराव सत्रात धोनी सहभागी झाला होता. त्याने प्रशिक्षक दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव केला. याव्यतिरिक्त या सत्रात हार्दिक पांड्या व मनीष पांडे सहभागी झाले होते. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे संकेत मिळत असल्यामुळे उभय संघ ३०० चा आकडा नोंदवण्यास उत्सुक आहेत. विराट व धोनीकडून प्रेरणा घेतो : हार्दिक पांड्यादडपणाच्या स्थितीत चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्याकडून मिळते, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने व्यक्त केली. रांचीमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या वन-डे सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना पांड्याने आपल्या सीनिअर खेळाडूंची प्रशंसा केली. तो म्हणाला, ‘‘धोनी व कोहली फलंदाजी करीत असताना बरेच काही शिकायला मिळते. त्यांची फलंदाजी आणि धावा पळण्याची क्षमता प्रेरित करणारी असते. त्यांना एकत्र फलंदाजी करताना बघणे आनंददायी असते.’’ धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे सकारात्मक बाब आहे. मोहालीमध्ये धोनीच्या फलंदाजीचा आनंद घेतला. लॅथमने केली टेलरची पाठराखणभारत दौऱ्यात निराशाजनक कामगिरीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या रॉस टेलरची न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमने पाठराखण केली. माजी कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमनेही टेलरवर टीका केली होती. मॅक्युलमने आपल्या आत्मचरित्रात ‘डिक्लेअर्ड’मध्ये कर्णधारपदादरम्यान टेलर खेळाडूंना प्रेरित करीत नव्हता. खेळाडूंसोबत संवाद साधण्यात तो अपयशी ठरला, अशी टीका केली आहे. याबाबत बोलताना लॅथम म्हणाला, ‘‘तसा मला कधी अनुभव आला नाही. टेलर या दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला.’’ त्याने मोहालीमधील लढतीत ४४ धावा केल्या होत्या. लॅथमला अखेरच्या दोन लढतींत टेलरकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. लॅथम म्हणाला, ‘‘टेलर अनुभवी आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे, तर काही खेळाडूंना विशेष अनुभव नाही. आम्ही सर्वोत्तम खेळ केला तर निश्चितच यश मिळेल. टेलरने गेल्या लढतीत खेळपट्टीवर काही वेळ घालविला असून त्याला सूर गवसल्याचे संकेत मिळाले आहेत.’’प्रतिस्पर्धी संघभारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, अमित मिश्रा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मनदीप सिंग.न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, टॉम लॅथम, रॉस टेलर, कोरी अँडरसन, ल्यूक राँची, जिम निशाम, मिशेल सँटेनर, टीम साऊदी, मॅट हेन्री, ईश सोढी, अँटोन डेवसिच, बीजे वॉटलिंग, डग ब्रेसवेल.