शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा मलेशियाविरुद्ध विजयाचा निर्धार

By admin | Updated: April 7, 2015 23:28 IST

पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळविण्यात अपयशी ठरलेला भारतीय हॉकी संघ अझलन शाह हॉकी स्पर्धेत मलेशियाविरुद्ध बुधवारी खेळल्या

इपोह : पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळविण्यात अपयशी ठरलेला भारतीय हॉकी संघ अझलन शाह हॉकी स्पर्धेत मलेशियाविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळवण्यास उत्सुक आहे. नवनियुक्त प्रशिक्षक पॉल वान ऐस यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या पहिल्या स्पर्धेत भारताला अद्याप विजय मिळविता आलेला नाही. पहिल्या लढतीत कोरियाविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर भारताला सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध २-१ ने पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या बाजूचा विचार करताना भारतापेक्षा विश्व मानांकनामध्ये तीन स्थानाने खालच्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाने विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाला संघर्ष करण्यास भाग पाडले. या लढतीत मलेशियाला २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. मलेशियाला मायदेशातील चाहत्यांना पाठिंबा मिळत असून दडपणाखाली भारतीय संघाची कामगिरी कशी होते, याबाबत उत्सुकता आहे. भारताची गेल्या दोन्ही सामन्यांतील कामगिरी निराशाजनक नव्हती. चेंडूवर नियंत्रण राखण्याच्या बाबतीत भारतीय संघ वरचढ होता, पण चांगल्या चाली व सर्वोत्तम फिनिशिंग करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. या व्यतिरिक्त दडपणाखाली भारताच्या बचाव फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय स्ट्रायकर विशेषत: रमनदीप सिंग ‘आऊट आॅफ फॉर्म’ असल्याचे दिसून आले. आकाशदीप व निकिन थिमैया यांनी चांगली कामगिरी केली, पण रमनदीपने अनेक संधी गमावल्या. युवा स्ट्रायकर मनदीप सिंग कोरियाविरुद्धच्या लढतीत दुखापग्रस्त झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्याला सहभागी होता आले नाही. तो अद्याप पूर्णपणे फिट नाही. भारताला पेनल्टी कॉर्नरवर मेहनत घेणे आवश्यक आहे. व्ही.आर. रघुनाथ व रुपिंदर पाल सिंग यांच्यासारख्या दोन विश्वदर्जाच्या ड्रॅग फ्लिकरचा समावेश असल्यामुळे पेनल्टी कॉर्नर भारताची मजबूत बाजू आहे. भारतीय संघाला सकारात्मक निकालासाठी मैदानावर चुका टाळणे आवश्यक असल्याचे मत प्रशिक्षक वान यांनी व्यक्त केले आहे. वान म्हणाले,‘आमच्या खेळामध्ये काही चूक नव्हती. चांगल्या खेळानंतरही आम्ही अपयशी ठरलो. आगामी कालावधीत मैदानावर चुका टाळणे आवश्यक आहे.’ दुसऱ्या बाजूला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या संघर्षपूर्ण खेळामुळे मलेशियन संघाने लक्ष वेधले होते. (वृत्तसंस्था)