ज्युनिअर विश्व अॅथलेटिक्ससाठी भारताची दावेदारी
By Admin | Updated: December 11, 2015 00:01 IST2015-12-11T00:01:49+5:302015-12-11T00:01:49+5:30
पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या विश्व ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारताने दावेदारी सादर केली आहे. २० वर्षे गटाच्या विश्व चॅम्पियनशिपचे आयोजन १९ ते २४ जुलै २०१६ या कालावधीत होईल.

ज्युनिअर विश्व अॅथलेटिक्ससाठी भारताची दावेदारी
नवी दिल्ली : पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या विश्व ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारताने दावेदारी सादर केली आहे. २० वर्षे गटाच्या विश्व चॅम्पियनशिपचे आयोजन १९ ते २४ जुलै २०१६ या कालावधीत होईल.
आधी हे आयोजन रशियाच्या कझान शहरात होणार होते; पण डोपिंगच्या आरोपांमुळे आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने रशियाचे सदस्यत्व संपविले. याच कारणास्तव यजमानपद कझानकडून हिसकावून घेण्यात आले आहे. भारतासह आॅस्ट्रेलिया (पर्थ) आणि पोलंड (बिदगोशेज) यांनीदेखील दावेदारी सादर केली आहे. भारताने यजमान शहराची घोषणा अद्याप केली नसली,
तरी नवी दिल्लीला यजमान शहर बनविण्यात येऊ शकते. आयएमएफ २३ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत सर्व अर्जांची छाननी करणार आहे. (वृत्तसंस्था)