भारतासमोर मालदीवचे आव्हान

By Admin | Updated: December 31, 2015 01:43 IST2015-12-31T01:43:09+5:302015-12-31T01:43:09+5:30

गटातील दोन सहज विजयानंतरही भारताला उद्या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ कप) फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मालदीवच्या कडव्या आव्हानाला सामोरे

India's challenge for Maldives | भारतासमोर मालदीवचे आव्हान

भारतासमोर मालदीवचे आव्हान

तिरुवअनंतपूरम : गटातील दोन सहज विजयानंतरही भारताला उद्या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (सॅफ कप) फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मालदीवच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
अ गटात श्रीलंकेवर २-0 आणि नेपाळवर ४-१ असा विजय मिळवीत अव्वल स्थानी राहिलेल्या भारताला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत; परंतु भारतीय संघाचा खरा कस मालदीवविरुद्ध लागणार आहे.
मालदीव दक्षिण आशियातील एक तुल्यबळ संघांपैकी एक आहे आणि त्यांनी २00८ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. त्याचप्रमाणे १९९७, २00३ आणि २00९ मध्ये हा संघ उपविजेता ठरला. त्याचप्रमाणे फिफा रँकिंगमध्येदेखील मालदीव १६0, तर भारत १६६ व्या स्थानावर आहे.
गत चॅम्पियन अफगाणिस्तान १५0 व्या स्थानासह स्पर्धेत सहभागी होणारा चांगली रँकिंग असणारा संघ आहे. भारतासाठी जमेची बाब म्हणजे त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सर्वच नॉकआऊट सामन्यांत मालदीवला पराभूत केले आहे. याशिवाय भारतीय संघाने आता सुरू असलेल्या या स्पर्धेत एकही सामना गमावेला नाही.

Web Title: India's challenge for Maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.