शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आॅलिम्पिकमध्ये भारताची ‘सेंच्युरी’

By admin | Published: June 27, 2016 3:49 AM

आॅलिम्पिकच्या इतिहासात भारताचे प्रथमच शंभरपेक्षा जास्त खेळाडू पात्र ठरले आहेत.

नवी दिल्ली : आॅलिम्पिकच्या इतिहासात भारताचे प्रथमच शंभरपेक्षा जास्त खेळाडू पात्र ठरले आहेत. रियोला जाणाऱ्या विविध खेळांच्या पथकांची संख्या १०३ झाल्यामुळे आतापर्यंत खेळाडू पात्रतेची सेंच्युरी साजरी केली आहे. आतापर्यंत हा सर्वांत मोठा संघ असणार आहे. रविवारी अ‍ॅथलेटिक्स प्रकारात तीन, तर आर्चरीमध्ये एका खेळाडू रियोचे तिकीट मिळविल्यानंतर भारताची संख्या १०३ वर गेली आहे. यापूर्वी २०१२ लंडन आॅलिम्पिसाठी १३ क्रीडा प्रकारात ८३, २००८ मध्ये बीजिंगसाठी १२ क्रीडा प्रकारासाठी ५७, २००४ मध्ये अथेन्ससाठी १४ क्रीडा प्रकारात ७३, २००० मध्ये सिडनीसाठी ८ क्रीडा प्रकारांत ६५, १९९६ मध्ये अटलांटामध्ये १३ क्रीडा प्रकारासाठी ४९, तर १९९२ मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी ५३ खेळाडू पात्र झाले होते. या सर्व स्पर्धांमध्ये लंडन येथे भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य (विजय कुमार, सुशिल कुमार) व ४ कांस्यपदके गगन नारंग, सायना नेहवाल, मेरी कोम, योगेश्वर दत्ता) जिंकली होती. बीजिंग येथे एक सुवर्ण (अभिनव बिंद्रा) व दोन कांस्य (विजेंद्र सिंग, सुशिल कुमार), अथेन्स येथे एक रौप्य (राजवर्धन सिंह राठोड), सिडनी येथे एक कास्य (मल्लेश्वरी), अटलांटा येथे एक कांस्यपदक (लिएंडर स्पेस) जिंकले होते. (वृत्तसंस्था)>नवी दिल्ली : भारताच्या मोहम्मद अनिस, शार्बनी नंदा, अंकित शर्मा तर अनातू दास यांनी आपआपल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून रिया आॅलिम्पिकसाठी आपले तिकीट पक्के केले. रियोसाठी अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची संख्या आता २३ तर एकूण भारतीय खेळाडूंची संख्या १०३ झाली आहे. पोलिश अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोहम्मद अनिसने पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४५.४० सेकंदांची वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रिया आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. अनिसने राजीव अरोकियाने नोंदविलेला ४५.४७ सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. कझाकिस्तान येथील अलमाटीमध्ये झालेल्या २६ व्या कोसनोव्ह मेमोरियल स्पर्धेत ओरिसाच्या शार्बनी नंदाने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २३.०७ सेकंदाची वेळ नोंदविली. दुसरीकडे राष्ट्रीय विजेता मध्य प्रदेशच्या अंकित शर्माने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात ८.१७ मीटरचे अंतर कापून रियोसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. भारतीय आर्चरी असोसिशनच्या वतीने बंगळुरू येथे निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पश्चिम बंगालचा २४ वर्षीय अनातू दासने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात रियो आॅलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली. आगामी रियो आॅलंपिक स्पर्धेसाठी पुरुष व महिला हॉकी संघ प्रत्येकी १८-१८ असे ३६ खेळाडू आहेत़ या खेळानंतर अ‍ॅथलेटिक्सचे सर्वात मोठे दल असणार आहे़ (वृत्तसंस्था)>अंतनू दास : बंगळुरू येथे झालेल्या निवड चाचणीत २४ वर्षीय कोलकाताच्या अंतनू दासने माजी आॅलिम्पिकयन जयंत तालुकदार व मंगलसिंह चम्पिया यांनी पराभूत केले. अंतनूने ६५३ गुणांची कमाई केली. त्याच्याकडे १.५ बोनस गुण होते. त्याने तालुकदार (६५९ गुण) व चम्पिया (६४९) यांच्यानंतर क्वालिफाय केले होते. त्यानंतर अंतनूने नॉकआऊट राउंडमध्ये या दोघांनाही पराभूत केले.