भारताची सावध सुरुवात

By Admin | Updated: July 10, 2014 02:03 IST2014-07-10T02:03:25+5:302014-07-10T02:03:25+5:30

नाबाद शतकाच्या (122) बळावर भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी 4 गडय़ांच्या मोबदल्यात 259 धावा उभारल्या.

India's cautious start | भारताची सावध सुरुवात

भारताची सावध सुरुवात

अजय नायडू - नॉटिंघम
सलामीवीर मुरली विजयने एकाग्रता आणि कौशल्याचा शानदार नमुना सादर करीत ठोकलेल्या नाबाद शतकाच्या (122) बळावर भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी 4 गडय़ांच्या मोबदल्यात 259 धावा उभारल्या. विजयने संधीचा लाभ घेत विदेशातील पहिले आणि कारकिर्दीत चौथे शतक गाठले. तो 294 चेंडू टोलवून 122 धावांवर नाबाद आहे. त्यात 2क् चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने अखेरच्या षटकांत 3क् वे अर्धशतक झळकाविले. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी नाबाद 81 धावांची भागीदारी केली.  भारताकडून स्टुअर्ट बिन्नीने कसोटी पदार्पण केले. 
सुरुवातीला शिखर धवन (12) लवकर बाद होऊनही विजय आणि पुजारा यांनी डाव सावरला होता; पण दुपारच्या सत्रत पुजारा (38), तसेच विराट कोहली (1) पाठोपाठ बाद झाले. विजयने एक टोक सांभाळून 176 चेंडूंचा सामना करीत शतक गाठले. अजिंक्य रहाणो याने 32 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून अँडरसनने 7क् धावांत दोन, तर ब्रॉड व प्लंकेट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्याआधी भारताने उपहारार्पयत 1 बाद 1क्6 अशी वाटचाल केली होती. त्यावेळी विजय आणि पुजारा खेळपट्टीवर होते. दोघांनी दुस:या गडय़ासाठी 73 धावांची भागीदारी केली. उपहारानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. जेम्स अँडरसन (5क् धावांत दोन बळी) आणि स्टुअर्ट ब्रॉड (19 धावांत एक बळी) यांचे चेंडू अनपेक्षितपणो स्विंग होऊ लागले. पुजारा दुस:याच षटकांत परतला. अँडरसनचा आत येणारा चेंडू बॅटला चाटून गेला. हा ङोल इयान बेल याने उजवीकडे ङोपावत सिली मिडऑनवर टिपला. पुढच्या षटकांत कोहली बाद झाल्याने भारताला बॅकफुटवर यावे लागले. 3 बाद 1क्7 अशा स्थितीतून संघाला मुरलीनेच बाहेर काढले. विजय आणि अजिंक्य रहाणो यांनी एका तासात 14 षटकांत केवळ 18 धावा केल्या. या 
दोघांनी अँडरसन आणि ब्रॉड वगळता अन्य गोलंदाजांच्या चेंडूवर धावा कुटल्या. (वृत्तसंस्था)
 
भारत पहिला डाव : मुरली विजय खेळत आहे 122, शिखर धवन ङो. प्रायर गो. अँडरसन 12, पुजारा ङो. बेल गो. अँडरसन 38, कोहली ङो. बेल गो. ब्रॉड 1, रहाणो ङो. कूक गो. प्लंकेट 32, महेंद्रसिंग धोनी खेळत आहे 5क्, अवांतर 4, एकूण : 9क् षटकांत 4 बाद 259 धावा. गोलंदाजी :  अँडरसन 21-6-7क्-2, ब्रॉड 19-8-26-1,  स्टोक्स 19-4-47-क्, प्लंकेट 21-4-56-1, अली 9-क्-5क्-क्, ज्यो रुट 1-क्-6-क्.
 

 

Web Title: India's cautious start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.