शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेवर भारताचा बहिष्कार

By admin | Updated: June 6, 2015 01:12 IST

भारतीय संघाच्या सदस्यांना अमेरिकन दूतावासाने व्हिसा न दिल्यामुळे भारतीय तिरंदाजी संघाला जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पधतून अखेर माघार घ्यावी लागली.

नवी दिल्ली : कोरियन प्रशिक्षक चाए वोम लिमसह भारतीय संघाच्या सदस्यांना अमेरिकन दूतावासाने व्हिसा न दिल्यामुळे भारतीय तिरंदाजी संघाला जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पधतून अखेर माघार घ्यावी लागली. भारतीय तिरंदाजी महासंघाचे कोशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी याविषयी सांगितले की, व्हिसा नाकरण्याचा विरोध म्हणून आम्ही स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय एएआयचे अध्यक्ष कुमार मल्होत्रा यांनी घेतला असून आम्ही पुन्हा एकदा व्हिजासाठी निवेदन केलेला आहे.भारतीय संघात २0 वर्षांखालील मुले आणि मुली आहेत. ज्युनिअर तिरंदाजांना शनिवारी अमेरिकेला रवाना व्हायचे होते. ते ८ ते १४ जूनदरम्यान साऊथ डकोटाच्या यांकटोन येथील स्पर्धेत सहभागी होणार आहेत.अमेरिकन दूतावासाने फक्त सात तिरंदाज, दोन प्रशिक्षक आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यास व्हिसा दिला आहे, तर अन्य २0 जणांना व्हिसा देण्यास नकार दिला आहे. लिम यांच्याशिवाय भारतीय प्रशिक्षक मिम बहादूर गुरंग, चंद्रशेखर लागुरी, राम अवधेश आणि मालिशिये पिंकी यांनादेखील व्हिसा मिळाला नाही.व्हिसा अधिकारी या उमेदवारांच्या मुलाखतीने समाधानी नव्हते आणि त्यांना यातील अनेक जण स्पर्धेनंतर परतणार नाही अशी शंका होती, असे वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.सचदेवा म्हणाले ही धक्कादायक घटना आहे. आमच्या सर्वाधिक तिरंदाज असम, झारखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील आहेत. अनेकांना इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे ते त्यांची बाजू व्यवस्थित मांडू शकले नाही. जेव्हा व्हिसा अधिकाऱ्यांनी त्यांना जीवन जगण्यासाठी काय करता तेव्हा त्यांनी आम्ही तिरंदाज आहोत आणि तिरंदाजी करतो असे उत्तर दिले. त्यामुळे व्हिसा अधिकाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी व्हिसा देण्यास नकार दिला; परंतु लिम यांना व्हिसा का दिला नाही याचे आपल्याला आश्चर्य वाटले. जागतिक तिरंदाजीत हे नाव प्रसिद्ध आहे आणि ते जगभरात फिरलेले आहेत. तिरंदाजी महासंघाने परराष्ट्र मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाशीही संपर्क साधला; परंतु त्यावर तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले.अमेरिकन तिरंदाजी महासंघाच्या सल्ल्यावर व्हिसा मिळण्यासाठी पुन्हा अर्ज केला आहे; परंतु उद्यापर्यंत व्हिसा मिळेल की नाही हे सांगता येत नाही. व्हिसा न मिळाल्यास या युवा खेळाडूंनी घेतलेल्या तीन महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाईल, असे सचदेवा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)अमेरिकन तिरंदाजी महासंघाकडून भारताला निमंत्रण मिळाले होते आणि भारत सरकारनेदेखील त्यास मान्यता दिली होती; परंतु त्यानंतरही व्हिसा दिला नाही. याचेही आपल्याला आश्चर्य वाटते.- वीरेंद्र सचदेवाभारतीय तिरंदाजी महासंघाचे कोशाध्यक्ष