भारताला विजयासाठी १७६ धावांचे लक्ष

By Admin | Updated: August 14, 2015 18:06 IST2015-08-14T18:06:19+5:302015-08-14T18:06:19+5:30

पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव ३६७ धावांमध्ये आटोपला. दिनेश चांडीमलच्या १६२ धावांच्या एकाकी झुंजीमुळे भारतासमोर आता विजयासाठी १७६ धावांचे आव्हान आहे. भारताकडून

India's 176 for victory | भारताला विजयासाठी १७६ धावांचे लक्ष

भारताला विजयासाठी १७६ धावांचे लक्ष

पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव ३६७ धावांमध्ये आटोपला. दिनेश चांडीमलच्या १६२ धावांच्या एकाकी झुंजीमुळे भारतासमोर आता विजयासाठी १७६ धावांचे आव्हान आहे. भारताकडून आश्विनने ४ आणि अमित मिश्राने ३ बळी टिपले. तर अजिंक्य रहाणेने एकाच कसोटी सामन्यात ८ झेल घेण्याचा विक्रम केला आहे. दिवसाअखेर भारताची अवस्था ८ षटकात एक बाद २३ अशी झाली असून शिखर धवन १३ धावांवर तर इशांत शर्मा ५ धावावर नाबाद आहे. लोकेश राहुल ५ धावांवर बाद झाला आहे. भारताला विजयासाठी अजून १५७ धावांची गरज असून ८ विकेट हातात आहेत. भारताच्या संपुर्ण आशा शिखर धवन, कर्णधार विराट, रोहित आणि राहणेवर आहेत.

श्रीलंकेने तिसऱ्या दिवशी खेळाची सावध सुरवात केली पण वरुण अ‍ॅरोनने पहिल्या सत्रात धमीका प्रसादला ३ धावावर बाद करूण भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर संगकारा आणि कर्णधार मॅथ्यूजने डाव सावरला. पण संगकारा ४० धावांवर असताना अश्विनने रहाणेकरवी बाद केले. दिनेश चांडीमलने १६२ धावांची महत्वपूर्ण खेळी करुन संघाची धावसंख्या ३६७ पर्यंत पोहचवली. कर्णधार मॅथ्यूज (३९), मुबारक (४९) थिरुमने (४४) यांचे पर्यंत अपुरे पडले. भारताकडून आश्विनने ४, अमित मिश्राने ३, हरभजन, वरुण अ‍ॅरोन आणि इशांत शर्मा यांनी प्रतेकी एक-एक बळी मिळवले.

Web Title: India's 176 for victory