भारताचे 119 खेळाडू रिओ ऑलिम्पिकमध्ये दाखल, अभिनव बिंद्रानं केलं खेळाडूंचं नेतृत्व
By Admin | Updated: August 6, 2016 07:36 IST2016-08-06T06:40:46+5:302016-08-06T07:36:14+5:30
रिओ ऑलिम्पिकच्या ३१व्या स्पर्धेचे आयोजन ब्राझीलमधल्या रिओ दी जानेरो शहरात केले आहे.

भारताचे 119 खेळाडू रिओ ऑलिम्पिकमध्ये दाखल, अभिनव बिंद्रानं केलं खेळाडूंचं नेतृत्व
ऑनलाइन लोकमत
ब्राझील, दि. ६ - रिओ ऑलिम्पिकच्या ३१व्या स्पर्धेचे आयोजन ब्राझीलमधल्या रिओ दी जानेरो शहरात केले आहे. क्रीडा जगतातील सगळ्यांचे या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिलं आहे. या नयनरम्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा माराकाना मैदानावर सुरू झाला. जगभरातून तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू रिओ ऑलिम्पिक २०१६ या स्पर्धेत सहभागी झाले असून, स्वतःचं नशीब आजमावण्यास सज्ज झाले आहेत. भारताकडून यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक दाखल झाले. भारताकडून जवळपास ११९ खेळाडूंनी ऑलिम्पिकमधल्या विविध खेळांसाठी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
माराकाना मैदानावरील उद्घाटन सोहळ्यात ब्राझीलची संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे आकर्षक पोस्टर पाहायला मिळत आहेत. रिओ ऑलिम्पिक 2016 स्पर्धेत सहभागी झालेल्या २०५ देशांच्या खेळाडूंच्या संचलनाला सुरुवात झाली. माराकाना मैदानावर जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
WATCH: Abhinav Bindra leads the Indian Contingent at the #OpeningCeremony of the #Rio2016https://t.co/cNRDPfsCVr
— ANI (@ANI_news) August 6, 2016