भारतीय महिला अव्वल स्थानी थॉमस अ‍ॅन्ड उबेर चषक

By Admin | Updated: May 21, 2014 02:41 IST2014-05-21T02:41:15+5:302014-05-21T02:41:15+5:30

सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूने आपल्या नावाला साजेसा उत्कृष्ट खेळ करीत डब्ल्यु एफ थॉमस अ‍ॅन्ड उबेर चषक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत थायलंडचा ३-२ गेमने पराभव

Indian women's top ranked Thomas and Uber Cup | भारतीय महिला अव्वल स्थानी थॉमस अ‍ॅन्ड उबेर चषक

भारतीय महिला अव्वल स्थानी थॉमस अ‍ॅन्ड उबेर चषक

नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूने आपल्या नावाला साजेसा उत्कृष्ट खेळ करीत डब्ल्यु एफ थॉमस अ‍ॅन्ड उबेर चषक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत थायलंडचा ३-२ गेमने पराभव करुन विजयाची हॅटट्रिक साधत वाय गटात अव्वलस्थान प्राप्त केले. पहिल्या एकेरीत भारताच्या सायना नेहवालने रत्चानोक इंतानोनला ४२ मिनिटांत २२-२०, २१-१४ असे पराभूत करून आपल्या संघाला विजयी सुरूवात करून दिली. दुसर्‍या एकेरीत पी. व्ही. सिंधूने पोर्नटिप बुरानाप्रासर्तसुकला ३७ मिनिटांत २१-१९, २१-१४ असे नमविले. दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या भारताच्या अव्वल जोडीने डुआंगनोंग आरनकेसोर्न आणि सावित्री अमृतापई यांना ३३ मिनिटांत २१-१६, २१-१३ असे पराभूत केले. तिसर्‍या एकेरीमध्ये भारताच्या पी. सी. तुलसीला बुसानन ओंगबुमरंगपानकडून ३६ मिनिटांत १५-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. दुसर्‍या दुहेरीत सायना-सिंधूला कुंचाला-सापश्रीकडून १३-२१, २१-१८, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian women's top ranked Thomas and Uber Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.