भारतीय महिला हॉकी संघाची बेलारुवर मात

By Admin | Updated: March 5, 2017 23:51 IST2017-03-05T23:51:45+5:302017-03-05T23:51:45+5:30

भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी बेलारुसचा ३-१ ने पराभव करीत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग तिसरा विजय नोंदवला

Indian women's hockey team beat Belarus | भारतीय महिला हॉकी संघाची बेलारुवर मात

भारतीय महिला हॉकी संघाची बेलारुवर मात


भोपाळ : भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी बेलारुसचा ३-१ ने पराभव करीत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग तिसरा विजय नोंदवला. कॅनडामध्ये एप्रिल महिन्यात आयोजित हॉकी विश्व लीग दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या क्वार्टरमध्ये गोलफलक कोराच होता. त्यानंतर बेलारुसची कर्णधार रेयता बातुराने २४ व्या मिनिटाला गोल नोंदवित संघाचे खाते उघडले. भारतीय कर्णधार राणीने त्यानंतर ३५ व ३९ व्या मिनिटाला दोन मैदानी गोल नोंदवित भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. दीपिकाने ४२ व्या मिनिटाला गोल नोंदिवत भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाने ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Indian women's hockey team beat Belarus