भारतीय महिलांकडून विंडीजचा सफाया
By Admin | Updated: November 17, 2016 02:12 IST2016-11-17T02:12:41+5:302016-11-17T02:12:41+5:30
वेदा कृष्णमूर्तीचे अर्धशतक आणि फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडच्या ४ बळींच्या जोरावर भारतीय महिलांनी तिसऱ्या एकदिवसीय

भारतीय महिलांकडून विंडीजचा सफाया
मुलापाडू : वेदा कृष्णमूर्तीचे अर्धशतक आणि फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाडच्या ४ बळींच्या जोरावर भारतीय महिलांनी
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजचा १५ धावांनी पराभव करत ही मालिका ३-० ने जिंकत भारताने वेस्ट इंडीजचा सफाया केला.
भारतीय महिला संघाने ६ बाद १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ ४९.१ षटकांत १८४ धावांत गारद झाला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २०.५ षटकांत ३ फलंदाज ५२ धावांत गमावले होते. कृष्णमूर्ती (७१) आणि हरमनप्रीत कौर (१९) यांनी चौथ्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी करताना डाव सावरला. कृष्णमूर्तीने ७९ चेंडूंच्या खेळीत १० चौकार मारले. देविका वैद्यने ४५ चेंडूंत ३२ धावा केल्या, तर झुलन गोस्वामीने १८ धावांचे योगदान दिले.
वेस्ट इंडीजची सुरुवात चांगली झाली; परंतु, मधल्या फळीतील ३ फलंदाज धावबाद झाले. काइसिया नाईट (५५) आणि हॅली मॅथ्यूज (४४) यांनी सर्वाधिक धावा केल्या. ही मालिका महिला चॅम्पियनशिपचा भाग आहे आणि मालिका ३-० जिंकल्यामुळे भारताला दोन गुण मिळाले.(वृत्तसंस्था)