भारतीय महिला संघ सराव सामन्यात पराभूत

By Admin | Updated: February 6, 2017 01:27 IST2017-02-06T01:27:42+5:302017-02-06T01:27:42+5:30

आयसीसी महिला विश्वचषक क्वालिफायरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून सहा गड्यांनी पराभव पत्करावा लागला.

Indian women team lose in practice match | भारतीय महिला संघ सराव सामन्यात पराभूत

भारतीय महिला संघ सराव सामन्यात पराभूत

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्वालिफायरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून सहा गड्यांनी पराभव पत्करावा लागला.
मिताली राज हिच्या नेतृत्वात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाचा डाव ४८.३ षटकांतच १५५ धावांवर आटोपला. संघात थिरुष कामिनी एका बाजूने खिंड लढवत राहिली. मात्र, इतर खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत राहिल्या.
कामिनी हिने ७१ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने नाबाद ३० धावा केल्या. त्यानंतर कर्णधार मिताली राज हिने २६ धावांचे योगदान दिले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ३४.५ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या.

Web Title: Indian women team lose in practice match