शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CWG 2022:लॉन बॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी रचला इतिहास; चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडचा केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:07 IST

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंचा डंका सुरू आहे.

बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंचा डंका सुरू आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन सुवर्ण पदकांची नोंद झाली असताना भारताच्या लॉन बॉलिंगच्या महिला संघाने देखील पदक पटकावले आहे. भारतीय लॉन बॉलिंगच्या संघाने पदक जिंकून इतिहास रचला आहे. कारण भारताला या स्पर्धेत पहिलेच पदक मिळाले आहे. रुपा राणी तिर्की, नयनमोनी सैकिया, लवली चौबे आणि पिंकी सिंग या भारतीय लॉन बॉलिंगच्या महिला संघाने या खेळात भारताला पहिले राष्ट्रकुल पदक दिले आहे.  भारतीय महिलांनी रचला इतिहासभारतीय महिलांनी शानदार खेळी करत न्यूझीलंडचा १६-१३ असा पराभव करून महिलांच्या चौकार स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि रौप्यपदकावर आपले नाव कोरले. लॉन बॉल महिला गटात भारत व न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीची  लढत अत्यंत चुरशीची झाली. १-६ अशा पिछाडीवरून चार सदस्यीय भारतीय महिलांनी १०-७ अशी आघाडी मिळवली. मात्र न्यूझीलंडच्या संघाने पुनरागमन करताना १३-१२ अशी झेप घेतली, परंतु भारतीय महिलांनीही कमाल करत १६-१३ अशी आघाडी घेत बाजी मारून ऐतिहासिक पदक निश्चित केले. लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा रानी तिर्की यांचा भारतीय संघात समावेश होता. 

उद्या फायनलचा थरारलक्षणीय बाब म्हणजे लॉन बॉल स्पर्धेतील राष्ट्रकुल स्पर्धेमधील भारताने प्रथमच पदक जिंकले आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारतीय महिलांना दक्षिण आफ्रिकेचा संघाचा सामना करावा लागणार आहे. हा सामना मंगळवारी दुपारी ४.१५ वाजता सुरू होईल. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाSilverचांदीIndiaभारतNew Zealandन्यूझीलंड