शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भारतीय महिलांनी उडविला अमेरिकेचा ५-१ असा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 06:49 IST

पूर्णपणे हार पत्करलेल्या अमेरिकेकडून ५४व्या मिनिटाला पुनरागमनाचा प्रयत्न झाला. एरिन मटसनने गोल करत संघाला आत्मविश्वास मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

भुवनेश्वर : भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेची धमाकेदार सुरुवात करताना आपल्या पहिल्या सामन्यात जागतिकक्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या अमेरिकेला ५-१ असे लोळवले. जबरदस्त सांघिक खेळ केलेल्या भारतीयांना रोखणे अमेरिकेला अखेरपर्यंत जमले नाही. गुरजीत कौरने २ गोल करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताचा विजय गृहीतच होता. मात्र, ज्याप्रकारे भारतीय महिलांनी एकजुटीने खेळ केला ते सर्वात आनंददायी होते. खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी वरचढ ठरताना अमेरिकेला कोणतीही संधी दिली नाही. विशेष म्हणजे मध्यंतराला भारताने १-० अशी आघाडी घेतली होती आणि यानंतर चार धामाकेदार गोल करत भारतीयांनी अमेरिकेच्या आव्हानातली हवाच काढली. भारतीयांनी केवळ ११ मिनिटांमध्ये चार गोल करत दबदबा राखला.

सामन्यातील २८व्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर लिलिमा मिंजने गोल करत भारताला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर ४०व्या मिनिटाला शर्मीला देवीने गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. अमेरिका या धक्क्यातून सावरत असतानाच ४२व्या मिनिटाला गुरजीत कौरने भारताचा तिसरा गोल करत संघाला सामन्यावर घट्ट पकड मिळवून दिली. या दमदार आघाडीमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीयांनी सातत्याने अमेरिकेच्या गोलपोस्टवर हल्ले केले. त्यात नवनीत कौर (४६वे मिनिट) आणि पुन्हा एकदा गुरजीत कौर (५१ मिनिट) यांनी गोल करत भारताला ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून देत सामन्याचा निकालही स्पष्ट केला.

यावेळी पूर्णपणे हार पत्करलेल्या अमेरिकेकडून ५४व्या मिनिटाला पुनरागमनाचा प्रयत्न झाला. एरिन मटसनने गोल करत संघाला आत्मविश्वास मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर भारतीय बचावफळीने जबरदस्त प्रदर्शन करताना अमेरिकन्सला आपल्या गोलक्षेत्रापासून दूर ठेवण्यात यश मिळवले.पुरुषांचाही विजयभारतीय पुरुष संघानेही जबरदस्त विजय मिळवताना तुलनेत दुबळ्या असलेल्या रशियाचे आव्हान ४-२ असे परतावले. यासह भारतीय पुरुष व महिला संघ ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यापासून अत्यंत जवळ पोहचले आहेत. दोन्ही संघ शनिवारी आपला दुसरा सामना खेळतील.

मनदीप सिंगने २४व्या आणि ५३व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयामध्ये निर्णायक कामगिरी केली. तसेच हरमनप्रीत सिंग याने ५व्या, तर सुनीलने ४८व्या मिनिटाला महत्त्वपूर्ण गोल केले.

रशियाकडून अँड्री कुरेव याने १७व्या आणि अखेरच्या क्षणी जॉर्जी अरुसिया यांनी प्रत्येकी एक गोल केला.

टॅग्स :Hockeyहॉकी