भारतीय संघ जोरदार मुसंडी मारेल, सचिनला विश्वास
By Admin | Updated: February 26, 2017 14:13 IST2017-02-26T14:13:31+5:302017-02-26T14:13:31+5:30
पुणे कसोटीत दारूण पराभव झाला असला तरी भारतीय क्रिकेट संघ पुढील सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला

भारतीय संघ जोरदार मुसंडी मारेल, सचिनला विश्वास
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 -पुणे कसोटीत दारूण पराभव झाला असला तरी भारतीय क्रिकेट संघ पुढील सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर विराट कोहलीच्या संघावर टीका होत असताना दिल्लीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या सचिनने कोहलीच्या संघाला पाठिंबा दिला आहे.
''ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटीत पराभव स्वीकारावा लागला म्हणजे मालिका गमाविली असे होत नाही. पराभव हा क्रिकेटचाच एक भाग आहे. जय-पराजय हा खेळाचाच भाग आहे. भारतासाठी पुण्यातील कसोटी आव्हानात्मक होती. पण एका पराभवाने मालिकेचा निकाल लागत नाही. आपल्या संघात क्षमता आहे आणि आपण पुन्हा मालिकेत पुनरागमन करू. ऑस्ट्रेलियाच्या संघालाही याची जाण आहे''. असं सचिन म्हणाला.
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 1-0 ने पुढे आहे. दुसरी कसोटी बंगळुरू येथे 4 मार्चपासून सुरू होणार आहे.