भारतीय संघ अंतिम फेरीत

By Admin | Updated: April 11, 2017 04:04 IST2017-04-11T04:04:55+5:302017-04-11T04:04:55+5:30

मोहंमद अलीशान ६, राहुलकुमार राजभर, प्रताप लाक्रा, आकश एक्का, सैफ मुहोंमद खान आणि मनीप कारकेट्टी यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर

Indian team in final | भारतीय संघ अंतिम फेरीत

भारतीय संघ अंतिम फेरीत

भोपाळ : मोहंमद अलीशान ६, राहुलकुमार राजभर, प्रताप लाक्रा, आकश एक्का, सैफ मुहोंमद खान आणि मनीप कारकेट्टी यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारतीय शालेय हॉकी संघाने चीनचा १०-० गोलने धुव्वा उडवित ५व्या आशियाई शालेय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
भोपाळ येथील अशिबाग हॉकी स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारतीय खेळाडूंनी चीनविरुद्ध सुरुवातीपासून निर्विवाद वर्चस्व राखले. भारताच्या राहुलकुमार राजभरने लढतीच्या पहिल्याच मिनिटाला गोल करून आपल्या संघाचे खाते उघडले. त्यांनतर भारतीय खेळाडूंनी चीनची बचावफळी खिळखिळी करून १० गोल करीत अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली.
भारतीय संघाला अंतिम फेरीत बलाढ्य मलेशियाविरुद्ध लढावे लागणार आहे. मलेशियाने सिंगापूर संघाला १२-१ गोलने पराभूत केले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Indian team in final