भारतीय संघ ढेपाळला, १५२ धावांवर सर्वबाद

By Admin | Updated: August 7, 2014 21:01 IST2014-08-07T18:05:37+5:302014-08-07T21:01:54+5:30

इंग्लंडसोबतच्या चौथ्या कसोटी सामन्यात १५२ धावांवर भारताचे सर्वखेळाडू बाद झाले आहेत.

The Indian team dumped, 152 runs in total | भारतीय संघ ढेपाळला, १५२ धावांवर सर्वबाद

भारतीय संघ ढेपाळला, १५२ धावांवर सर्वबाद

ऑनलाइन टीम

मँचेस्टर, दि. ७ - इंग्लंडसोबतच्या चौथ्या कसोटी सामन्यात १५२ धावांवर भारताचे सर्वखेळाडू बाद झाले आहेत. इंग्लंडच्या संघाने आज क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीवर विशेष मेहनत घेत भारतीयखेळाडूंना मैदानावर येताच तंबूचा रस्ता दाखवला. कोणत्याही खेळाडूला ५० च्या पुढे धावा करता आल्यानाहीत. अपवाद फक्त कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा. धोनीने १३३ चेंडूत ७१ धावा केल्या. तसेच मुरली विजय,चेतेश्वर पुजारा, विराटकोहली, रविंद्र जडेजा आणिआर.अश्वीन यांना भोपळाही न फोडता आल्याने क्रिकेट रसिकांची घोर निराशा झाली. अजिंक्य व धोनीच्या जोडगोळीने भरतीय संघाची गळती काही काळा करता थांबवून धरली होती. परंतू, इयान बेल कडे झेल गेल्याने फक्त २४ धावांवर रहाणे तंबूत परतला. इंग्लंड दौ-यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनऐवजी गौतम गंभीरचा या सामन्यात समावेश करण्यात आला. मात्र इंग्लंडच्या गोलदाजांसमोर गंभीरही टीकाव धरु शकला नाही. धावफलकावर सात धावा झाल्या असताना गौतम गंभीरच्या (४ धावा) रुपात इंग्लंडने भारताला पहिला धक्का दिला. यानंतर भारताच्या फलंदाजांमध्ये झटपट तंबूत परतण्याची स्पर्धाच सुरु असावे असे चित्र दिसत होते. शेवटचा खेळाडू पंकज सिंग त्रिफळाचीत झाल्याने क्रिकेटरसिकांच्या आशा मावळल्या.

Web Title: The Indian team dumped, 152 runs in total

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.