श्रीलंका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, अमित मिश्राचे पुनरागमन
By Admin | Updated: July 23, 2015 12:17 IST2015-07-23T12:12:42+5:302015-07-23T12:17:03+5:30
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून फिरकी गोलंदाज अमित मिश्राने पुनरागमन केले आहे.

श्रीलंका दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, अमित मिश्राचे पुनरागमन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून विराट कोहलीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. १२ ऑगस्टपासून श्रीलंकेत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून फिरकी गोलंदाज अमित मिश्राने संघात पुनरागमन केले आहे. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली.
श्रीलंका दौ-यासाठी भारतीय संघ : विराट कोहली (क), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान सहा, हरभजन सिंग, आर.अश्विन, उमेश यादव, वरूण अॅरॉन, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा.