भारताचे तिरंदाजीत ‘रौप्य’ पक्के

By Admin | Updated: September 26, 2014 04:28 IST2014-09-26T04:28:30+5:302014-09-26T04:28:30+5:30

महिला तिरंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर आज, गुरुवारी आशियाई स्पर्धेत पुरुष तिरंदाजांनी कंपाउंड गटातील टीम स्पर्धेत आपले रौप्यपदक पक्के केले़

Indian silver medal in 'Archery' | भारताचे तिरंदाजीत ‘रौप्य’ पक्के

भारताचे तिरंदाजीत ‘रौप्य’ पक्के

महिला तिरंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर आज, गुरुवारी आशियाई स्पर्धेत पुरुष तिरंदाजांनी कंपाउंड गटातील टीम स्पर्धेत आपले रौप्यपदक पक्के केले़ भारताकडून अभिषेक वर्मा, रजत चौहान, संदीप कुमार यांनी अटीतटीच्या दुस-या  उपांत्य फेरीत ईरानच्या इस्माईल इबादी, माजिद घिदी आणि आमिर कजेमपोर यांच्यावर २३१-२२७ अशी मात करताना फायनलमध्ये प्रवेश केला़ या विजयासह भारतीय तिरंदाजांनी आपले रौप्यपदक पक्के केले आहे़ असे असले तरी भारतीय खेळाडू सुवर्णपदक मिळविण्याच्या इराद्याने फायनलमध्ये खेळणार आहेत़ भारताचा सामना अंतिम फेरीत यजमान दक्षिण कोरियाशी होणार आहे़ दक्षिण कोरियाने अन्य उपांत्य फेरीत फिलिपीन्सला २२८-२२७ अशी धूळ चारली़
 

Web Title: Indian silver medal in 'Archery'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.