बेनेलींकडून भारतीय नेमबाजांची प्रशंसा
By Admin | Updated: February 28, 2017 03:57 IST2017-02-28T03:57:01+5:302017-02-28T03:57:01+5:30
इटलीचे महान नेमबाज आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेते आणि दोन वेळेसचे वर्ल्ड चॅम्पियन आंद्रिया बेनेली यांनी प्रशंसा केली.

बेनेलींकडून भारतीय नेमबाजांची प्रशंसा
नवी दिल्ली : आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसआधी भारताचा अव्वल स्कीट नेमबाज मेराज अहमद खान याची इटलीचे महान नेमबाज आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेते आणि दोन वेळेसचे वर्ल्ड चॅम्पियन आंद्रिया बेनेली यांनी प्रशंसा केली.
बेनेली इटली संघाचे प्रशिक्षक म्हणून आले आहेत. आगामी युरोपियन चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी युरोपमधील अनेक अव्वल नेमबाजांनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु बेनेली अशा संघासोबत आले आहेत ज्यात रिओ आॅलिम्पिक पुरुष व महिला स्कीटमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. मेराजविषयी बेनेली म्हणाले, ‘‘मेराज खूप चांगला नेमबाज आहे. त्याच्याजवळ अनुभवदेखील आहे. तो देशासाठी चांगली कामगिरी करीत आहे. त्याला चांगले प्रशिक्षक लाभले आहेत. या स्पर्धेत पदक जिंकण्याची त्याला चांगली संधी आहे.’’ त्याच्यात खेळाच्या या मोठ्या व्यासपीठावर पदक जिंकण्याची क्षमता आहे का, असे विचारले असता आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता बेनेली यांनी त्याच्यात पदक जिंकण्याची क्षमता असल्याचे सांगितले.