भारतीय नेमबाजांची आघाडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 04:04 AM2019-05-29T04:04:10+5:302019-05-29T04:04:14+5:30

येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी भारताचा एकही नेमबाज पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही.

Indian shooters continued their lead | भारतीय नेमबाजांची आघाडी कायम

भारतीय नेमबाजांची आघाडी कायम

Next

म्युनिच : येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी भारताचा एकही नेमबाज पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही. मात्र भारत अद्यापही तीन सुवर्णपदकांसह पदकतालिकेत अग्रस्थानी कायम आहे.
दिवसभरात केवळ दहा मीटर एअर रायफल स्पर्धा झाली. झेक गणराज्यच्या फिलिप नेपेजचालने सुवर्ण जिंकले. भारताच्या दीपक कुमारने पात्रता फेरीत ६२८.३ गुण मिळवले. मात्र तो अंतिम फेरी गाठू शकला नाही.
दीपकने शानदार सुरुवात करताना पहिल्या दोन खेळाडूंमध्ये स्थान मिळवले होते. मात्र यानंतर अखेरच्या २० शॉटमध्ये त्याची कामगिरी खालावली. दीपकचे सहकारी दिव्यांश पनवार व रविकुमार अनुक्रमे ३१ व ८६ स्थानावर राहिले.

Web Title: Indian shooters continued their lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.