रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेला पात्र
By Admin | Updated: April 11, 2015 16:49 IST2015-04-11T16:43:37+5:302015-04-11T16:49:39+5:30
पुढील वर्षी 'रिओ दि जानेरो' येथे होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेला पात्र ठरली आहे.

रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेला पात्र
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पुढील वर्षी 'रिओ दि जानेरो' येथे होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेला पात्र ठरली आहे. दक्षिण कोरिया येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत अपूर्वीने १० मीटर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. या प्रकारात पहिल्या सहा स्थानात येणारे खेळाडू ऑलिम्पिकसाटी पात्र ठरणार होते. अपूर्वीने १८५.६ गुणांसह तिसरे स्थान पटकावल्याने तिचा ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित झाला. या स्पर्धेत क्रोएशियाच्या शान्जेना जेकिक हिने सुवर्ण (२०९.१) तर सर्बियाच्या इव्हाना मॅक्सिमोव्हिकने २०७.७ गुणांसह रौप्य पदक पटकावले. भारतीय नेमबाज जीतू रायनंतर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली अपूर्व ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.