भारतीय खेळाडूंनी जिंकली ५४ पदके
By Admin | Updated: July 20, 2016 17:07 IST2016-07-20T17:07:20+5:302016-07-20T17:07:20+5:30
ट्रॅपझोन (तुर्कस्तान) येथे झालेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी गेलेला १४६ मुला-मुलींचा भारतीय शालेय संघ मंगळवारी दुपारी नवी दिल्ली येथे सुखरूप पोहोचला. भारतीय खेळाडूंनी

भारतीय खेळाडूंनी जिंकली ५४ पदके
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - ट्रॅपझोन (तुर्कस्तान) येथे झालेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी गेलेला १४६ मुला-मुलींचा भारतीय शालेय संघ मंगळवारी दुपारी नवी दिल्ली येथे सुखरूप पोहोचला. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत १० सुवर्ण, १९ रौप्य व २५ कांस्य पदके जिंकली.
तुर्कस्तानमध्ये झालेल्या लष्करी उठावाने निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणामुळे भारतीय खेळाडूंच्या पालकांना चिंता वाटत होती. या वेळी तुर्कस्तानमध्ये असलेल्या भारती दूतावासतील अधिकाऱ्यांनी भारतीय खेळाडूंना संभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा परिस्थितीत भारताच्या खेळाडूंनी कोणतेही दडपण न घेता पदकांचे अर्धशतक गाठले. यामध्ये पुणे-मुंबईचे खेळाडू मंगळवारी सायंकाळी आपापल्या शहरांत दाखल झाले. यामध्ये पुण्यात कुस्तीपटू सौरभ पाटील (फ्रीस्टाईल ६० किलोगट सुवर्ण), आदर्श गुंड (ग्रीकोरोमन ९६ किलोगट कांस्य), मुलींच्या मिडले रिले प्रकारात रौप्यपदक जिंकलेल्या सिद्धी हिरे, मासनी पर्वतकर, संगीता शिंदे, जलतरणमधील स्वेजल मानकर यांचे आगमन झाले.