खेळाडूंचा बेड टी असणार भारतीय

By Admin | Updated: June 10, 2014 01:24 IST2014-06-10T01:24:11+5:302014-06-10T01:24:11+5:30

ब्राझीलमध्ये आगामी 12 जूनपासून सुरू होणा:या फुटबॉल विश्वचषकादरम्यान खेळाडूंना भल्या पहाटे मिळणा:या बेड टीचा आस्वाद हा भारतीय चहाचा असणार आहे.

Indian players will not be in bed | खेळाडूंचा बेड टी असणार भारतीय

खेळाडूंचा बेड टी असणार भारतीय

>अगरतळा : ब्राझीलमध्ये आगामी 12 जूनपासून सुरू होणा:या फुटबॉल विश्वचषकादरम्यान खेळाडूंना भल्या पहाटे मिळणा:या बेड टीचा आस्वाद हा भारतीय चहाचा असणार आहे.
विश्वचषकादरम्यान खेळाडूंना देण्यात येणा:या चहासाठी पानाची उपलब्धता पश्चिम बंगालचा चॅटर्जी गार्डन ग्रुप (सीजीजी) करीत आहे. त्याचे सहायक संचालक प्रबीर डे यांनी सांगितले की, विश्वचषक फुटबॉलसाठी 
त्यांनी पश्चिम बंगालच्या मईबारी येथे मूळ चीनपासून उद्गम झालेली विशेष ऑर्गेनिक चहा उगवण्यात आली आहे. 
मकईबारी जगातील पाच विशेष चहा बागांपैकी एक आहे आणि फिफा विश्वचषकासाठी विशेष चहाची तयारी येथे एका वर्षाआधी सुरू करण्यात आली होती.श्री डे यांनी सांगितले, सीजीजी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंना त्यांची दिनचर्या सुरू करतेवेळी बेड टी देणार असल्याने आम्हाला आनंद वाटतोय. 
फुटबॉल विश्वचषकासाठी देण्यात येणा:या चहाच्या पानांची किंमत ही 24 हजार रुपये प्रति किलोग्रॅम आहे. चहाची रोपटी आंतरराष्ट्रीय दर्जानुसार वाढवली जातात. त्यांची पाने तोडताना विशेषरूपाने प्रशिक्षित कर्मचारीच ठेवले जातात. 

Web Title: Indian players will not be in bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.