...तो भारतीय खेळाडू ढसाढसा रडला होता
By Admin | Updated: November 18, 2014 01:06 IST2014-11-18T01:06:48+5:302014-11-18T01:06:48+5:30
आयपीएल सहामध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणाचा मुद्गल समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे.

...तो भारतीय खेळाडू ढसाढसा रडला होता
नवी दिल्ली : आयपीएल सहामध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणाचा मुद्गल समितीचा अहवालातून धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. एन श्रीनिवासन, गुरूनाथ मयप्पन, सुंदर रमन आणि राज कुंद्रा यांच्यासह १३ जणांचा या प्रकरणाशी संबध असून यात भारताच्या दोन अव्वल खेळाडूंचा समावेश असल्याची बाब समोर येत आहे.
एका इंग्रजी दैनिकाामध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात या अहवालात भारताच्या दोन अव्वल खेळाडूंचा समावेश असल्याचे म्हटले आहे आणि त्यापैकी एक हा भारतीय विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू आहे. तसेच फिक्सिंगबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो मुद्गल समितीसमोर ढसाढसा रडल्याचे समजते. आपले नाव जाहिर केल्यास कारकिर्द संपुष्टात येईल, असेही तो खेळाडू म्हणाला. यातील एक खेळाडू अष्टपैलू असून मुद्गल समितीच्या चौकशी दरम्यान तो रडत होता आणि वारंवार नाव जाहिर न करण्यासाठी विनवणीही करत होता. दुसरा खेळाडू हा जलदगती गोलंदाज आहे. उर्वरित आयुष्य सन्मानाने जगण्याची आमची इच्छा असून नाव न जाहिर करण्याची विनंती हे दोघेही वारंवार समितीसमोर करत होते.
या चौकशी दरम्यान समितीने बुकींसमोर खेळाडूंना नेले आणि यापैकी कोणाला ओळखता का अशी विचारणाही केली. चार तासांच्या चौकशीनंतर या खेळाडूने अधिकाऱ्यांना अनपेक्षित विचारणा केली. तो म्हणाला, चौकशी पुर्ण झाली असेल तर आता माझ्याबरोबर तुम्हाला फोटो काढायचा आहे का? यावर अधिकारी चिडला, परंतु त्याने स्मिथ हास्य दिले. तो खेळाडू हुशार आणि आत्मविश्वासाने भरलेला असल्याची प्रतिक्रीया या आधिकाऱ्याने नंतर दिली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या १९० पानी अहवालातही खेळाडू आणि मयप्पन यांच्यातील मोबाईलद्वारे झालेल्या चौकशीचा तपशील मांडला आहे.