भारतीय खेळाडूंसाठी खुर्च्या, टीव्ही संच खरेदी करणार
By Admin | Updated: August 3, 2016 20:27 IST2016-08-03T20:27:03+5:302016-08-03T20:27:03+5:30
आॅलिम्पिक आयोजन समितीने अतिरिक्त खुर्च्या आणि टीव्ही संच पुरविण्यास नकार दिल्यानंतर भारतीय आॅलिम्पिक पथक प्रमुख राकेश गुप्ता यांनी भारतीय दूतावासाच्या

भारतीय खेळाडूंसाठी खुर्च्या, टीव्ही संच खरेदी करणार
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि.३ - आॅलिम्पिक आयोजन समितीने अतिरिक्त खुर्च्या आणि टीव्ही संच पुरविण्यास नकार दिल्यानंतर भारतीय आॅलिम्पिक पथक प्रमुख राकेश गुप्ता यांनी भारतीय दूतावासाच्या माध्यमातून हे सामान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुप्ता म्हणाले,‘ हॉकी संघाने अतिरिक्त खुर्च्या तसेच टीव्ही संच पुरविण्याची विनंती केली होती. मी आयोजन समितीला यासंदर्भात विनंती केली.
पण त्यांनी असमर्थता दाखविली. सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना एकसारखीच सुविधा देण्यात आली असल्याचे त्यांचे मत होते.’
दरम्यान गुप्ता यांनी स्वत:च्या कार्यालयातील खुर्च्या आणि टीव्ही संच भारतीय हॉकी संघासाठी उपलब्ध करून दिले. अॅथ्लेटिक्स पथकाने देखील साहित्याची मागणी केली होती. अखेर गुप्ता यांनी भारतीय दूतावासाच्या माध्यमातून साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पुढील काही दिवसात हे साहित्य अपार्टमेंटमध्ये आणले जाणार आहे.
गुप्ता म्हणाले,‘मी टीव्ही संचांसाठी केबल कनेक्शन्सचा देखील शोध घेतला. केबल कनेक्शन्सचे वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. ही व्यवस्था एका दिवसात होईल. भारतीय खेळाडूंच्या प्रत्येक मागणीवर विचार होत आहे. जितके शक्य होईल, तितक्या सोयी पुरविण्याची आमची योजना आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणा-या खेळाडूंच्या मागण्या पूर्ण झाल्या किंवा नाही याची खात्री करून घेणे आमचे कर्तव्य आहे.’