शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

भारतीय खेळाडू यश मिळविण्यास उत्सुक

By admin | Updated: January 2, 2017 00:35 IST

भारतीय टेनिसपटू एकेरीत अव्वल खेळाडू साकेत मायनेनीच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या एटीपी चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत आपल्या

चेन्नई : भारतीय टेनिसपटू एकेरीत अव्वल खेळाडू साकेत मायनेनीच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या एटीपी चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या मारिन सिलिचसह टेनिस जगतातील काही सर्वोत्तम खेळाडू सहभागी होत आहेत. तीनवेळ जेतेपदाचा मान मिळवणारा स्टेनिसलास वावरिंकाच्या अनुपस्थितीनंतर यात दिग्गज खेळाडू सहभागी होत आहेत. त्यात एकेरीच्या ड्रॉमध्ये आघाडीच्या ५० पैकी सहा खेळाडूंचा समावेश आहे. सिलिचसाठी २०१६ हे वर्ष शानदार ठरले. त्याचा सहकारी व गेल्यावर्षी अंतिम फेरीत धडक मारणारा बोर्ना कोरिच, स्पेनचा रोबर्टा बातिस्ता एगुटा आणि एलबर्ट रामोस विनोलास यांचा समावेश राहील. त्यात युवा भारतीय खेळाडूंवर आपली उपस्थिती सिद्ध करण्याचे आव्हान राहणार आहे. मायनेनी व स्थानिक खेळाडू रामकुमार रामनाथन टूरमध्ये आपली छाप सोडण्यास प्रयत्नशील आहेत, पण ते जास्तीत जास्त चॅलेंजर पातळीवर खेळलेले आहेत. या दोघांना मुख्य ड्रॉमध्ये वाईल्डकार्ड प्रवेश देण्यात आला असून त्याचा लाभ घेण्याची गरज आहे. भारताकडे एकमेव एटीपी २५० स्पर्धा आहे. २९ वर्षीय मायनेनीने गेल्यावर्षी अमेरिकन ओपनची पात्रता मिळवली होती, पण त्याचा फिटनेस बघता एटीपी २५० पातळीवर त्याने सातत्य राखणे गरजेचे आहे. भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू मायनेनीला रशियाच्या मिखेल युज्नीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. युज्नी जागतिक क्रमवारीत ५७ व्या स्थानी आहे. रामकुमारने कारकिर्दीच्या सुरुवातीला चमकदार कामगिरी करताना काही संस्मरणीय विजय मिळवले, पण त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याची सर्व्हिस व मैदानी फटके शानदार आहेत, पण मानसिक कणखरतेचा अभाव दिसतो. रामकुमारला पहिल्या फेरीत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाऱ्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे प्रजनेश गुणेश्वरन आपली कारकीर्द सावरण्यास प्रयत्नशील आहे. युकी भांबरी मुख्य फेरीतकोपराच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या युकी भांबरीने रविवारी दुसऱ्या फेरीत अर्जेंटिनाच्या निकोलस किकरचा ६-३, ६-१ ने पराभव केला आणि चेन्नई ओपनच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले. प्रजनेश गुणेश्वरनला मात्र पराभव स्वीकारावा लागला. युकीने किकरचा केवळ ५९ मिनिटांमध्ये पराभव केला. मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत त्याला मायदेशातील डेव्हिस कप संघातील सहकारी रामकुमार रामनाथनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. प्रजनेशने पात्रता फेरीच्या अखेरच्या लढतीत स्लोव्हाकियाच्या जोसेफ कोवालिकविरुद्ध ६-७, २-६ ने पराभव केला. मुख्य ड्रॉच्या एकेरीमध्ये आता तीन भारतीय खेळाडू खेळतील. युकी व रामनाथन यांच्याव्यतिरिक्त साकेत मायनेनी यांचा एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये समावेश अहे. मायनेनीची सलामी लढत रशियाचा अनुभवी मिखाईल युज्नीसोबत होणार आहे. दुहेरीमध्ये भारताची पकड मजबूत दिसत आहेत. त्यात महान खेळाडू लिएंडर पेसव्यतिरिक्त चार जोड्या सहभागी होत आहेत. पेस ब्राझीलच्या आंद्र सा याच्या साथीने खेळणार आहे. अनुभवी पेसला पहिल्या फेरीत मायदेशातील सहकारी दिविज शरण व पुरव राजा या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. राजा व शरण यांची २०१६ मध्ये कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यांना मायदेशात तिसरे एटीपी जेतेपद पटकावण्याची संधी आहे. गेल्यावर्षी त्यांनी लोस काबोसमध्ये जेतेपद पटकावले.२०१३ ते २०१५ या कालावधीत सलग तीनदा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या वावरिंकाच्या अनुपस्थिीतीत क्रोएशियाचा सिलिच २०१६ मधील कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. गेल्यावर्षी त्याने पॅरिस मास्टर्समध्ये नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव केला होता. त्यापूर्वी त्याने सिनसिनाटीमध्ये कारकिर्दीत प्रथमच मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्याने अंतिम फेरीत अँडी मरेचा पराभव केला होता. मोसमाच्या अखेर त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम सहावे मानांकन मिळवले आहे. सिलिचने टेनिस जगतातील चार आघाडीच्या खेळाडूंना आव्हान दिले आहे. भारतातील एकमेव एटीपी २५० स्पर्धेत सहभागी होणारे सर्वोत्तम खेळाडू आहे. चाहते या दिग्गजाचा खेळ बघण्यास उत्सुक आहेत. सिलिचने येथे २००९ व २०१० मध्ये जेतेपद पटकावले होते. तो निश्चितच जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानावर असलेल्या बातिस्ता एगुटसाठी २०१६ हे चांगले वर्ष ठरले. त्याने दोन एटीपी जेतेपद पटकावले आणि सर्बियाचा महान खेळाडू जोकोव्हिचचा पराभव केला. कोरिचने २०१३ च्या अखेरीस व्यावसायिक टेनिसमध्ये प्रवेश केला. २० वर्षीय क्रोएशियन खेळाडू चेन्नईमध्ये छाप सोडण्यास उत्सुक आहे.