शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Anupama Upadhyay: अभिमानास्पद! भारताच्या अनुपमा उपाध्यायची ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 18:44 IST

अनुपमा ही एक खास पराक्रम करणारी ठरली केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू

Anupama Upadhyay: भारताची युवा बॅडमिंटनपटू अनुपमा उपाध्याय हिने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या (BWF) ताज्या ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थानी (Junior World Number 1 in BWF rankings) धडक मारली. मुलींच्या अंडर-19 एकेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती दुसरी भारतीय बनली. या वर्षी युगांडा आणि पोलंडमध्ये आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या पंचकुलाच्या १७ वर्षीय अनुपमाने मंगळवारी भारताच्या तस्नीम मीरला क्रमवारीतील अव्वल पदावरून धक्का दिला. अनुपमाने १८ स्पर्धांमध्ये १८.०६० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे तिला दोन स्थानांचा फायदा झाला. अनुपमा ज्युनियर क्रमवारीत पहिल्या १० मधील चार भारतीय मुलींपैकी एक आहे. Top 10 मधील इतर तीन भारतीय मुलींमध्ये तस्नीम (दुसऱ्या), १४ वर्षांची अन्वेषा गौडा (सहाव्या) आणि उन्नती हुडा (नवव्या) यांचा समावेश आहे.

ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याच्या बाबतीत अनुपमा ही सहावी भारतीय ठरली. मुलांच्या एकेरी गटात आदित्य जोशी (२०१४), सिरिल वर्मा (२०१६), लक्ष्य सेन (२०१७) यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते, तर १८ वर्षीय शंकर मुथुसामी सुब्रमण्यनने गेल्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला होता. मुलींच्या गटात भारताची तस्नीम अव्वल होती. मात्र तिला अनुपमाने धक्का देत अव्वल स्थान पटकावले.

अनुपमाने अलीकडेच वरिष्ठ महिलांच्या गटात अव्वल १०० मध्ये प्रवेश केला आणि सध्या ती जागतिक क्रमवारीत ६३व्या स्थानावर आहे. अनुपमाने जानेवारीमध्ये सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 300 स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती आणि त्यानंतर ऑर्लीन्स ओपन सुपर 100 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. ती सध्या आगामी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. ही स्पर्धा १७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत स्पेनच्या सँटेनर येथे खेळवली जाणार आहे.

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत