शहरं
Join us  
Trending Stories
1
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
2
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
3
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
4
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?
5
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
6
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
7
हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!
8
लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
9
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
10
Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!
11
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
12
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
13
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
14
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
15
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
16
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
17
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
18
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
19
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
20
वॉशिंग्टनमधील मराठी कला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५०० भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप 

आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:29 IST

भारतीय संघ आता शनिवारी चीनविरुद्ध भिडेल.

राजगिर (बिहार) : यजमान भारताने गुरुवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात मलेशियाचे तगडे आव्हान ४-१ असे परतवले. दुसन्याच मिनिटाला गोल स्वीकारून पिछाडीवर पडल्यानंतर भारतीयांनी कमालीची मुसंडी मारत मलेशियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. भारतीय संघ आता शनिवारी चीनविरुद्ध भिडेल.

मलेशियाने आक्रमक सुरुवात करताना सामन्याच्या दुसन्याच मिनिटाला गोल करत १-० अशी आघाडी घेतली. शफिक हसन याने हा शानदार गोल करत भारतावर दडपण आणले. यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघ दडपणात खेळला.

मलेशियाने या संधीचा फायदा घेत आपल्या खेळाला चांगला वेग दिला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीयांनी ३ गोल करत सामन्याचे चित्रच पालटले. यावेळी भारतीयांच्या आक्रमक आणि वेगवान खेळापुढे मलेशियाचे खेळाडू हतबल झाले. मनप्रीत सिंगने १६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्यानंतर १८ व्या मिनिटाला सुखजीत सिंगने शानदार मैदानी गोल करत भारताला २-१ असे आघाडीवर नेले. यानंतर शिलानंद लाक्राने २४ व्या मिनिटाला गोल केला आणि विवेक प्रसादने ३८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला ४-१ अशी भक्कम आघाडी मिळवून देत संघाचा विजयही स्पष्ट केला. या विजयासह सुपर फोर फेरीत भारतीय संघाने ४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून मलेशिया आणि चीन प्रत्येकी ३ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसन्य स्थानी आहेत. कोरिया एका गुणासह चौथ्या स्थानी आहे.

चीनचा कोरियाला धक्का

चीनने गुरुवारी सुपर फोर गटातील लढतीत अनपेक्षित निकाल नोंदवताना गतविजेत्या कोरियाला ३-० असा धक्का दिला. बुधवारी याच कोरिया संघाविरुद्ध भारताला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. बेन्हाई चेन याने दोन, तर जीशेंग गाओ याने एक गोल केला. कोरियाने या लढतीत १२ पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण त्यांना एकही संधी साधता आली नाही. त्याचवेळी, चीनने सहापैकी २ पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बाजी मारली.

टॅग्स :Hockeyहॉकीasia cupएशिया कप