भारतीय फुटबॉल संघ मंजुरीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: September 9, 2014 03:53 IST2014-09-09T03:53:22+5:302014-09-09T03:53:22+5:30
चियोन आशियाड सुरू होण्याआधी सराव सामने खेळायला गेलेल्या भारतीय फुटबॉल संघाला सरकारकडून मंजूरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

भारतीय फुटबॉल संघ मंजुरीच्या प्रतीक्षेत
नवी दिल्ली : इंचियोन आशियाड सुरू होण्याआधी सराव सामने खेळायला गेलेल्या भारतीय फुटबॉल संघाला सरकारकडून मंजूरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
भारताचे पुरुष व महिला संघ तयारीसाठी चीनमध्ये आले आहेत. द. कोरियातील इंचियोन येथे १९ सप्टेंबरपासून आशियाडचे आयोजन होत असले तरी फुटबॉल स्पर्धा १४ पासून सुरू होईल. भारतीय फुटबॉल संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही संघांना मंगळवारी स्पर्धास्थळी रवाना व्हायचे आहे. संघांना मंजूरी नाकारण्यात आल्यास युवा खेळाडूंना निराशा देणारा अनुभव राहील. आपल्या देशाच्या परवानगीसाठी तिसर्या देशात अडकले आहे. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन दोन्ही संघांना मंजूरी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. क्रीडामंत्र्यांना त्यांच्या अधिकार्यांनी मात्र फुटबॉलसह पाच खेळांचे संघ पाठवू नये, असा सल्ला दिल्याची माहिती आहे.(वृत्तसंस्था)